मंत्रालयात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १६ नोव्हेबर २०२२ राज्यातील शिंदे व फडणवीस सरकार जरी असले तरी शेतकरी मात्र आजही आपल्या मागण्या सांगण्यासाठी नेहमी निवेदने देवूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आज सकाळी एका शेतकरीने मंत्रालय गाठत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या मंत्रालयात आज एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मंत्रालयात असलेल्या जाळीवर उडी घेत त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. जाळीमुळे त्याचा जीव वाचला आहे. हा तरुण बऱ्याच वेळ जाळीवर पडून होता. तिथेच तो आपल्या मागण्या काय आहेत, ते सांगत होता. त्यानंतर त्याला खाली उतरवलं. घटनास्थळी पोलिस दाखल झाले होते. बघ्यांची गर्दी मंत्रालयाच्या आतील परिसरामध्ये जमली होती. हा शेतकरी असल्याचं सांगितलं जात आहे. आपल्या मागण्या पूर्ण होत नसल्याने हे पाऊल उचलल्याचं या व्यक्तीने सांगितलं. या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजीदेखील केली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम