कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची निर्दोष मुक्तता !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १६ नोव्हेबर २०२२ दुहेरी हत्याकांडात गुन्हा सिद्ध करण्यास सरकारी यंत्रणेला अपयश आल्याने कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसह चार आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

मुंबईतल्या जेजे सिग्नलजवळ छोटा शकील टोळीतल्या आसिफ दधी उर्फ छोटे मिया आणि शकील मोडक यांची २९ जुलै २००९ मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या सगळ्या हत्याकांडाचा सूत्रधार छोटा राजन आहे असा आरोप त्याच्यावर होता. त्याच्यासोबत मोहम्मद अली जान, प्रणय राणे, उम्मेद हे तिघेही आरोपी होते. मात्र या सगळ्यांचीच निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

छोटा राजनसह या तिघांचाही गुन्हा सिद्ध करण्यास सरकारी यंत्रणेला यश आलं नाही. कोणतेही पुरावे हाती लागले नाहीत. शिवाय ओळख परेडमध्येही यश आलं नाही, त्यामुळे त्यांची मुक्तता करण्यात आली. गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेल्या गोळ्या आणि शस्त्रही जुळत नसल्याने या आरोपींची मुक्तता करण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष सीबीआय न्यायालयाने आज हा निकाल दिला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम