सरकारवर सुषमा अंधारेंचे जोरदार टीकास्त्र !
बातमीदार | १३ ऑक्टोबर २०२३
राज्यात गेल्या तीन ते चार दिवसापासून पुण्यातील पुण्यातील ससून रुग्णालयातील घडल्या प्रकारावर विरोधक जोरदार टीकास्त्र करीत असतांना ड्रग्ज माफिया ललित पाटील हे नाव चांगलेच चर्चेत आलं आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या ललित पाटीलचे नाशिक कनेक्शन समोर सुषमा अंधारे यांनी दादा भुसेंवर गंभीर आरोप केले होते. यावरुन सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा खळबळजनक खुलासे केले आहेत.
“ललित पाटील प्रकरणात आम्ही आवाज उठवत आहोत पण गृहखाते आणि आरोग्य खात यावर लक्ष देत नाही. या प्रकरणात ललित पाटीलसह ससूनचे डीन संजीव ठाकूर यांना सहआरोपी करा, तसेच या प्रकरणी नेमलेल्या समितीने संजीव ठाकूर यांची नार्को टेस्ट करा,” अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. तसेच याप्रकरणी कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचाही इशारा त्यांनी यावेळी दिली.
“गृहमंत्री साहेब आम्हालाही कायदा माहिती आहे. कुठली माहिती गोपनीय आणि कुठली ओपन करावी हे आम्हाला माहिती आहे. ललित पाटील प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आलाय हे सांगू नका, मात्र ललित पाटीलवर काय उपचार सुरू होते, याची माहिती द्या..” असेही अंधारे म्हणाल्या. “दादा भुसे यांचे नाव आम्ही घेतले आणि सगळ्यांनी आमच्यावर आरोप केले. मात्र नाशिकमध्ये एवढा मोठा कारखाना उभा कसा राहिला? याप्रकरणात पालकमंत्री देखील जबाबदार आहेत. अशा बेजबाबदार पालकमंत्र्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार आहे का?” असे म्हणत या प्रकरणात मंत्री गिरिश महाजनांचाही समावेश असल्याचा मोठा आरोप सुषमा अंधारेंनी केला.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम