केसांची गळती थांबविण्यासाठी हे उपाय महत्वाची !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १३ ऑक्टोबर २०२३

प्रत्येक महिला असो वा पुरुष आपल्या केसांची उत्तम प्रकारे निगा राखत असतात पण कधी कधी केस गळती मोठ्या प्रमाणावर होत असते, यावेळी अनेक लोक घरगुती उपाय करून पर्याय काढत असतात पण काही हेच पर्यायावर चुकीची पद्धत अवलंबल्यावर अनेक त्रास घडत असतात पण आज तुम्हाला आम्ही पाच टिप्स देणार आहोत ज्यातून तुमच्या केसांची गळती कमी होणार आहे.

दही केसांसाठी खूप चांगलं असतं. तुमच्या आजूबाजूला देखील अनेकजण दही केसांना लावत असतील. दही हे प्रथिने आणि कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात. केसांची गळती थांबवायची असेल आणि टक्कल पडण्यापासून स्वतःचं संरक्षण करायचं असेल तर दही केसांना लावा.

अक्रोड केसांसाठी फायदेशीर आहे कारण त्यात व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी, ओमेगा -3 फॅटी अॅसिड आणि प्रथिने असतात. हे सर्व घटक केस मजबूत आणि चमकदार बनविण्यास मदत करतात, ज्यामुळे केसगळती थांबते.

फॉलिक अॅसिड, व्हिटॅमिन ई आणि कॅल्शियम एका कुठल्या फळात असेल तर ते आहे एवोकॅडो. एवोकॅडो हे महाग फळ असल्यानं त्याचा समावेश सामान्यांच्या आहारात नाही. पण हे फळ खाल्ल्यानं केस मजबूत होतात आणि केस गळत नाहीत.

फळांसोबतच हिरव्या पालेभाज्या खाणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. पालक आणि मेथीमध्ये केसांच्या आरोग्यासाठीचे सगळे घटक असतात, यामुळे केस मजबूत होतात.

अंडी केसांसाठी खूप पोषक असतात. प्रथिने, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी 12 अंड्यामध्ये असते. अंडी खाल्ल्याने आणि केसांना लावल्याने केस गळती थांबते. केस मजबूत राहतात.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम