एकाही सजीवास हानी न पोचता विकास साधने म्हणजे शाश्वत विकास-डॉ कारभारी काळे
दै. बातमीदार I ५ डिसेंबर २०२२ I मानवी जीवन सुखकर होण्यासाठी निर्माण करण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण करताना निसर्गाची हानी होणार नाही,याची खबरदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे.निसर्गातील एकाही सजीवास हानी न पोचता विकास साधने म्हणजे शाश्वत विकास होय. असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ कारभारी काळे यांनी व्यक्त केले.
आकुर्डी येथील डॉ. डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज आणि डॉ. डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ एमसीए अँड मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने बालेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या “एशिया-आफ्रिका डेव्हलपमेंट कॉन्फरन्स समिट” या दोन दिवशीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी निती आयोगाचे सदस्य डॉ.आशिष कुमार पांडा, साउथ सुदाम मधील जॉन यत्ता कॉसमा लोकून,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता डॉ.पराग काळकर, साउथ सुदान येथील वक्ते तूतू स्टीफन यूसेफ, एशिया आफ्रिका डेव्हलपमेंट कौन्सिलचे महासंचालक डॉ रिपू रंजन, डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे कार्यकारी संचालक विंग कमांडर(नि) पीव्हीसी पाटील, आकुर्डी येथील डॉ. डी वाय पाटील शैक्षणिक संकुलाचे संचालक रेअर ॲडमिरल(नि)अमित विक्रम, डीवायपीआयएम एसचे, संचालक ऑपरेशन्स डॉ भरत चव्हाण, डी आर करनुरे, संचालक(कॉर्पोरेट रिलेशन्स) डॉ. जे जी पाटील,डीवायपीआयएमएस चे संचालक डॉ. कुलदीप चरक, डॉ डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ एमसीए अँड मॅनेजमेंटच्या संचालिका डॉ. के निर्मला अधिष्ठाता, डॉ शलाका पारकर आदी उपस्थित होते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम