दिपाली सय्यद शिंदे गटात? मुख्यमंत्री शिंदेंची घेणार भेट

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ९ नोव्हेबर २०२२ राजकारणात या गटातून त्या गटात नेते जात असल्याने कार्यकर्त्यामध्ये मोठा संभ्रम निर्माण होत आहे कि, आमचा नेता कोणत्या गटात आज या गटात तर उद्या दुसऱ्या गटातील नेत्यांची भेट घेणारे शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. शिवसेनेतल्या बंडानंतर त्यांनी उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांनी एकत्र येण्याची मागणी केली होती. तसंच आपण त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही सांगितलं होतं. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या शिंदे गटातल्या प्रवेशाची चर्चा सुरू आहे आणि आता त्यालाच हवा देणारी आणखी एक घटना होत आहे.

दीपाली सय्यद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. आज सकाळी साडेदहा वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी ही भेट होणार आहे. काही दिवसांपूर्वीही सय्यद शिंदेंना भेटल्या होत्या. तेव्हापासून त्यांच्या शिंदे गटातल्या प्रवेशाची चर्चा सुरू होती. मात्र त्यावेळी त्यांनी यावरुन काही ठोस उत्तर दिलं नव्हतं.
आपण लवकरच आपली राजकीय भूमिका जाहीर करू असं दीपाली सय्यद म्हणाल्या होत्या. त्यामुळे त्या शिंदे गटात जाणार की नाही, अशा चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आजच्या भेटीनंतर हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा दीपाली सय्यद यांच्या शिंदे गटातल्या प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम