पुणे मुंबईच्या डिशेस ची चव चाखायचीय; चला तर मग भेट द्या एसडीएम कॅफे प्लस रेस्टॉरंटला

उत्तराखंडचे नामांकित कुक अवतरलेत अमळनेरात, येथे मिळतो आता तंदूरीसह पंजाबी डिशेसचा खाना खजिना

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १९ ऑगस्ट २०२२ । अमळनेर-तुम्हाला पुणे मुंबईच्या हायजेनिक डिशेस चाखण्याची इच्छा झालीच तर बाहेरगावी जाण्याची तसदी घेऊ नका,अमळनेरातील सुप्रसिद्ध एसडीएम कॅफेने आपल्या दालनास भव्य रेस्टॉरंटची जोड दिल्याने याठिकाणी उत्तरांखंड राज्यातील नामांकित कुक अवतरले असून त्यांच्या हातच्या तंदूर आणि पंजाबी फूडच्या एकसे एक डिशेस आपल्याला चाखायला मिळत आहे.

उद्योजिका सौ सोनल मनीष जोशी यांच्या संकल्पनेतून रेस्टॉरंट प्लस ची किमया साकारली गेली आहे.येथील तंदूरी पनीर टिक्का,निजामी पनीर टिक्का आणि सोया चाप या डिशेसने तर अवघ्या आठच दिवसात धम्माल उडविली असून पिझ्झा आणि साऊथ इंडियन मध्ये नवीन व्हरायटी आल्याने याचीही ग्राहकांना भुरळ पडत आहे. जवळपास साऱ्याच डिशेस ग्राहकांच्या पसंतीस उतरीत आहेत,इंद्रभुवन हॉटेल च्या माध्यमातून केवळ क्वालिटीच्या बळावर नावारूपाला आलेला हा ग्रुप दोन वर्षांपूर्वीच एसडीएम कॅफे च्या रूपाने अधुनिकतेकडे वळला होता,यातही भन्नाट क्वालिटी आणि स्वच्छता यामुळे ग्राहकांच्या पसंतीस पडून या कॅफेला शौकिनानी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे.

म्हणून मिळाली रेस्टॉरंटची जोड…

एवढ्या स्टॅंडर्ड कॅफेत डिनर, सफर आणि इतरही खाना खजाना असावा अशी मागणी ग्राहकांची सतत होत असल्याने कॅफेच्या निर्मात्या तथा उद्योजिका सौ सोनल मनीष जोशी यांनी ग्राहकांची मागणी मनावर घेत आपल्याच संकल्पनेतून या कॅफेला रेस्टॉरंट ची जोड दिली असून मुंबई पुणे च्या धर्तीवरच हे रेस्टॉरंट साकारले आहे,येथील अत्याधुनिक किचन चे रूप मनाला भावेल इतके सुंदर असून परिपूर्ण स्वच्छता आणि संपुर्ण अत्याधुनिक कुलिंग सिस्टीम केल्याने “नो घान”नो “घाम” याचा प्रत्यय ग्राहकांना नक्कीच येत आहे.

जगप्रसिद्ध हॉटेलात सेवा देणारे कुक…

रेस्टॉरंटमध्ये रूपांतर करताना कुक आणि फूड च्या बाबतीत कोणतीही तडजोड नको हाच प्रयत्न उद्योजिका सोनल जोशी यांचा असल्याने त्यांनी अनेक नामांकित हॉटेलांचा सर्व्हे करून आपल्या कौशल्याने दर्जेदार कुक उपलब्ध केले आहेत,सदर कुकची टीम उत्तराखंड राज्यातील असून त्यांनी ताज ग्रुप,काश्मीर, सयाजी ग्रुप ऑफ हॉटेल्स,इंदोर आणि मुंबई पुण्यातील थ्री स्टार व फाईव्ह स्टार रेस्टॉरंट मध्ये सेवा दिली आहे.सर्व कुक वेल ट्रेन असल्याने रियल फूड आणि रियल टेस्ट शौकिनाना मिळत आहे,कोणतीही मिलावट नसल्याने एकप्रकारे आरोग्याची देखील काळजी घेतली जात आहे.

रेस्टॉरंटचा खाना खजाना आहे तरी काय?

एसडीएम कॅफेत असलेल्या डिशेस आपण चाखल्याच आहेत, आता प्लस रेस्टॉरंट मध्ये असणार आहे,पनीर सह सर्व प्रकारच्या पंजाबी डिशेस,काजू करी, काजू मसाला,नूर ए साग महल,सबजी मिनानो,व्हेज जालफ्रायी,व्हेज कढाई,राजमा मसाला,शेव भाजी च्या अनेक व्हरायटी,बेंगण च्या अनेक व्हरायटी,दाल फ्राय,दाल तडका,दाल मखनी, रोटी मध्ये विशेष करून तंदूर,नान,कुलचा पराठा,तवा रोटी,बटर रोटी,राईस आणि नूडल्स चे सर्व प्रकार याशिवाय पिझ्झा, बर्गर,सँडविच,पास्ता,फ्रँच फ्राईझ, साऊथ इंडियन,सूप,काम्बो,स्टार्टर,मोमोज,चाट अँड पापड,मोकटेल्स अँड शेक,डेजर्ट,आणि ब्रेव्हरेजेस यात भरपूर काही व्हारायट्या म्हणजेच तुम्ही मागणार त्या प्युअर व्हेज डिशेस येथे उपलब्ध झाल्या आहेत,नवीन रूप आणि नवीन व्हरायटी मुळे दररोज ग्राहकांची प्रचंड गर्दी होत आहे.

सब्जीच्या प्रत्येक दिशला मिळेल एक वेगळी टेस्ट…

एरव्ही कोणत्याही हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये गेल्यास काजू करी घ्या किंवा पनीरच्या डिशेस घ्या किंवा इतर कोणत्या डिशेस घ्या टेस्ट मात्र एकच मिळते येथे एसडीएमला मात्र सब्जीची कोणतीही डिश घेणार त्याची टेस्ट निश्चितपणे बदलणार असून बदलणारी टेस्ट शौकिनांच्या मनाला देखील नक्कीच भावणार आहे.

तेव्हा हा सारा प्रपंच केवळ तुमच्यासाठी असल्याने खऱ्या मनतृप्तीसाठी सहकुटुंब सहपरिवार जरूर जरूर भेट द्या असे विंनम्र आवाहन उद्योजिका सौ सोनल जोशी यांनी केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम