जळगाव रेल्वे मालधक्का येथे हमाल बांधवांना मिठाई वाटप

बातमी शेअर करा...

बातमीदार | १३ नोव्हेबर २०२३ | जळगाव रेल्वे मालधक्का माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष मुकेश बाविस्कर यांनी केली हमाल बांधवांची दिवाळी गोड

जळगाव दि.12 जळगाव रेल्वे मालधक्का माथाडी कामगार संघटने तर्फे हमाल बांधवांना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मिठाईवाटप करून त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न संघटनेचे अध्यक्ष मुकेश उर्फ आबा बाविस्कर यांनी केला.

व्हिडिओ पहा 👇           

https://fb.watch/ohV-s9VRKq/?mibextid=95YSWs

सालाबादाप्रमाणे याही वर्षी सुमारे 550 हमाल बांधवांना मिठाई व 30 भगिनींना मिठाई देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव महानगरपालिकेचे माजी उपमहापौर अश्विन भाऊ सोनवणे, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, माजी नगरसेवक किशोर बाविस्कर, बंटी गवळी, विनोद कोळी, सीताराम सेठ, मुकुंद चौधरी, केशव आप्पा,सचिन पुरोहित आदी उपस्थित होते. मिठाईवाटपप्रसंगी अश्विन सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आबा बाविस्कर हे हमाल बांधवांसाठी त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध असतात त्यांच्या सुखदुःखात सहभागी होतात त्यामुळे हमाल बांधवांनी नेहमीच आबाभाविस्कर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना साथ द्यावी असे ते म्हणाले व सदर उपक्रमाचे कौतुक केले.

      व्हिडिओ पहा 👇           

,कार्यक्रम यशस्वितेसाठी हुसेन साबरी, दीपक माने,लहू हटकर,संतोष हटकर,राजू भाट, विकी माने, इम्रान शेख, सुरेश बाविस्कर, किरण तडवी, छोटू बाविस्कर,प्रेम सुरवाडे, सिध्दार्थ वानखेडे,विशाल सुरवाडे,गौतम बिराडे, मंगेश काजवे, राज सुरवाडे,राहुल जाधव, सोनू सोनवणे,रवी जंजाळे, भूषण रांजण,सागर सोनवणे,सागर जाधव,पप्पू राठोड, आदींनी परिश्रम घेतले

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम