रात्री विमानाचा भीषण अपघात : १४ जणांचा मृत्यू !
बातमीदार | १७ सप्टेंबर २०२३
मुंबई विमानाचा झालेल्या भीषण अपघातानंतर शनिवारी रात्री ब्राझीलच्या उत्तरेकडील अॅमेझॉन राज्यात एका खासगी विमानाचा अपघात झाला आहे. अपघातामध्ये १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्यातील अधिकाऱ्यांनी दिली. अपघात बारसेलोस प्रांतात झाला असून राज्याची राजधानी मनाऊसपासून हे ४०० किलोमीटरचे अंतर आहे.
अॅमेझॉन राज्याचे राज्यपाल विल्सन लिमा यांनी एक्सवर प्रतिक्रिया दिली. ‘विमान अपघातात बारा प्रवाशी आणि दोन क्रू मेंबरच्या मृत्यूमुळे अतिव दु:ख झालं आहे. आवश्यक ती मदत देण्यासाठी आमची टीम मदत करत आहे. माझी सांत्वना आणि पार्थना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत’, असं ते म्हणाले.
A plane crashed in Brazil's northern Amazon state on Saturday leaving 14 dead. The accident took place in the Barcelos province, some 400 km (248 miles) from the state capital, Manaus, reports CNN Brasil, citing a local mayor.
— ANI (@ANI) September 16, 2023
मनाऊस एरोटॅक्सी एअरलाईनने प्रतिक्रिया जारी केली आहे. कंपनीने अपघाताची माहिती दिली आहे. पण, अपघाताचे कारण सांगितलेले नाही. तसेच याप्रकरणी मृत्यू आणि जखमींची माहिती दिलेली नाही. स्थानिक मीडिच्या माहितीनुसार, मृत्यूमध्ये अमेरिकी नागरिकांचा समावेश आहे. रायटरने यासंदर्भातील माहितीची पुष्टी केलेली नाही.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम