ठाकरे व शेलार आमने सामने ; उमेदवारी अर्ज करण्यासाठी शक्ती प्रदर्शन 

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १४ ऑक्टोबर २०२२ ।  दोन दिवसापासून ज्या  विधानसभा मतदारसंघात निवडणूकीची राजकीय चर्चा सुरु होती, त्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात निवडणूक होत असून, ऋतुजा लटके आणि मुरजी पटेल यांच्यातच थेट लढत होणार, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ऋतुजा लटके आज महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थित अर्ज दाखल करणार आहेत. येथे होणाऱ्या महाविकास आघाडीच्या रॅलीमध्ये आदित्य ठाकरेंसह नेते मंडळी आपले शक्तीप्रदर्शन करणार तर दुसरीकडे भाजपच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी आशिष शेलार उपस्थित राहणार आहे.

तत्पूर्वी रॅली काढून शक्तीप्रदर्शनही महाविकास आघाडीच्या वतीनं केलं जाणार आहे. दुसरीकडे मुरजी पटेल १३ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. तेही आज अर्ज दाखल करणार आहेत. शिवसेनेतल्या बंडानंतर होत असलेल्या पहिल्या निवडणुकीत जनमत कुणाला कौल देणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीसाठी आज ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’च्या उमेदवार ऋतुजा लटके, तर भाजपकडून मुरजी पटेल उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल होण्यापूर्वी महाविकास आघाडी आणि भाजप प्रणीत महायुतीने जोरदार शक्तीप्रदर्शन केलंय.

ऋतुजा लटकेंचा अर्ज दाखल करण्यापूर्वी महाविकास आघाडीकडून रॅली काढण्यात आली. या रॅलीत आदित्य ठाकरे, अनिल परब, प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह महाविकास आघाडीतले नेते सहभागी झालेत. तर मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी काढलेल्या रॅलीत आशिष शेलार, शिंदे गटाचे दीपक केसरकर, आमदार नितेश राणे यांच्यासह इतर नेते सहभागी झालेत. ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या नोकरीचा राजीनामा महापालिकेकडून स्वीकारण्यात आलाय. उच्च न्यायालयाने यासंदर्भात महापालिका प्रशासनाला आदेश दिले होते. ११ वाजेपर्यंत राजीनामा मंजूरीचं पत्र देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं सांगितलं होतं. आज राजीनामा स्वीकारण्यात आल्याचं पत्र ऋतुजा लटकेंना देण्यात आलंय.

ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर न केल्यानं महापालिका प्रशासनाला मुंबई उच्च न्यायालयानं फटकारलं. लटकेंनी या प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयानं राजीनामा मंजूर करण्याचे आदेश दिल्यानंतर काही वेळात महापालिका प्रशासनानं ऋतुजा लटकेंना फोन करण्यात आला होता. राजीनामा स्वीकारण्यात आल्याचं फोनवरून सांगण्यात आल्याची माहिती स्वतः लटकेंनीच दिलीये. राजीनामा मंजूर झाल्यानंतर आज लटके उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम