ठाकरे, फडणवीस व मुख्यमंत्री शिंदे उद्या एका व्यासपीठावर येणार

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० ऑक्टोबर २०२२ । राज्यात दिवाळी सन मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. त्याचेच औचित्य साधत राज्याचे मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्या शिवाजी पार्कवर एकाच व्यासपीठावर येणार आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवार, २१ ऑक्टोबर रोजी दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त हे तिन्ही महत्त्वाचे नेते एकाच व्यासपीठावर येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या दीपोत्सवाचे सायंकाळी साडेपाचच्या सुमारास उदघाटन होणार आहे.

शिंदे यांनी ठाकरे विरुद्ध दंड थोपटले. त्यानंतर ठाकरे नावाची उणीव दसरा मेळाव्यात भरून काढण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी जयदेव ठाकरे, स्मिता ठाकरे, निहार ठाकरे यांना आमंत्रित केले. आता राज ठाकरे यांच्याशीही शिंदे यांचे सूत चांगलेच जमते. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या एकत्रित येण्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

सध्या मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. सोबतच राज्यातल्या ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, सोलापूरसह जवळपास सतरा ते अठरा महापालिकेच्या निवडणुका येणाऱ्या काळात आहेत. यापूर्वी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणीस यांच्या भेटी झाल्या आहेत. त्यानंतर मनसे आणि भाजप युतीची चर्चा रंगली. आता तर शिंदे गट, मनसे आणि भाजपचे तीन दिग्गज एकत्र येत असल्याने पुन्हा या तिघांच्या युतीची चर्चा जोर धरते आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम