राऊतांची तोफ थंडावली ; अजित पवार गोड माणूस !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ एप्रिल २०२३ ।  गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार आणि संजय राऊत या महाविकास आघाडीतील शिलेदारांमध्ये जुगलबंदी रंगली होती. त्यांचे बाइट सुद्धा सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. त्यानंतर आजही अजित पवारांनी संजय राऊतांना फटकारले. या साऱ्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी मवाळ भूमिका घेतल्याचे दिसते.

संजय राऊत म्हणाले कि, अजित पवार खूप गोड माणूस आहे. आमच्यात कसलाही वाद नाही. परवाच आम्ही एका टेबलावर बसून जेवण केले, असे म्हणत संजय राऊत यांनी अजित पवारांसोबतच्या वादावर आज पडदा टाकला. ते मुंबईत बोलत होते. अजित पवार खूप गोड माणूस आहेत. ते सर्व लोकांशी प्रेम करतात. पवार कुटुंबातल्या कोणत्याही धटकाशी माझा कधीच वाद नव्हता आणि नाही. परवाच आम्ही एका टेबलावर बसून जेवण केले. अजित पवार हे महाविकास आघाडीचे सर्वात ज्येष्ठ आणि लोकप्रिय नेते आहेत. ते राहतील. पवार कुटुंबातील सर्व सदस्यांसोबत माझे चांगले संबंध आहेत, असे म्हणत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
संजय राऊतांना शरद पवारांबद्दल काही प्रश्न विचारले असता ते म्हणाले की, मी पवार साहेबांचा टाइम टेबल घेऊन बसलो नाही. मला भेटायचे होते, जाऊन भेटलो. मला बोलायचे होते, जाऊन बोललो. राष्ट्रवादीच्या कुठल्याही मुद्द्यावर मी बोलत नाही म्हणत पक्षांतर्गत घडामोडीवर बोलणे टाळले.

संजय राऊत म्हणाले की, एक सिनेमा होता मराठीत केला इशारा जाता-जाता. आता मी ही जाता-जाता इशारा करतो. शिवसेना ही चौकट तोडूनच काम करते, असा इशारा दिला. शिवाय आम्ही बाळासाहेब आंबेडकरांचे नेहमीच स्वागत केल्याचे त्यांनी सांगितले. खारघरमध्ये पन्नासच्या आसपास साधकांचा मृत्यू झाल्याचा दावाही केला. संजय राऊत यांनी ‘सामना’च्या रोखठोकमधून शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस फुटीच्या मार्गावर असल्याचे म्हटले होते. त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीचा संदर्भा दिला होता. पवार कुटुंबावर तपास यंत्रणांचा दबाव असल्याचाही दावा केला होता. या वक्तव्यावर अजित पवारांनी राऊतांचे नाव न घेता आमच्या पक्षाची बाजू मांडण्याचे तुम्हाला कोणी वकील पत्र दिले? असा सवाल केला होता. संजय राऊतांनी ‘मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, मी अजित पवारांचे का ऐकून घेऊ, माझ्यासाठी शरद पवारांची भूमिका महत्वाची आहे. मी फक्त शरद पवारांचे ऐकतो. शिवसेना फुटली तेव्हा मी आमचीच वकील केली, अशा शब्दांत अजित पवारांना प्रत्युत्तर दिले होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम