मनोज जरांगे पाटलांनी औषधांसह पाण्याचा केला त्याग !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ११ सप्टेंबर २०२३ | राज्यात गेल्या १४ दिवसापासून जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वात मराठा आरक्षणासाठी उपोषण सूरू असून राज्य सरकारने आतापर्यंत अनेकदा हे उपोषण सोडण्यासाठी प्रयत्न केले आहे. मात्र, राज्य सरकारचे सर्व प्रयत्न फेल ठरले आहेत. सरसकट आरक्षणाच्या आपल्या निर्णयावर मनोज जरांगे ठाम आहेत. राज्य सरकारच्या वतीने सातत्याने मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. मात्र, त्यांच्या मागण्याबाबत कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने जरांगे पाटील यांनी आपण उपोषण मागे घेणार नसल्याचे सांगितले आहे. यात आता मनोज जरांगे यांनी पाणी आणि औषधांही त्याग केला आहे. तसेच त्यांनी सलाईनही काढले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. त्यामुळे आरक्षणाचा पेच सुटणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा चौदावा दिवस आहे. एक सप्टेंबरला या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने आंदोलनाची चर्चा राज्यभर झाली होती. त्यात आता आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे जरांगे यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाने आतापर्यंत तीन वेळा चर्चा केली आहे. मात्र, त्यातून कोणताच तोडगा निघालेला नाही. राज्य सरकारने दोन अध्यादेश देखील काढले आहेत. तरी देखील मनोज जरांगे सरसकट आरक्षणाच्या मुद्यावर ठाम आहेत.
अनेक चर्चेच्या फेऱ्या करुन देखील राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील आढी अद्याप सुटलेली नाही. या संदर्भात निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलेला चार दिवसांचा अवधी संपला आहे. त्यामुळे त्यांनी पाणी पिणे आणि उपचार घेणे बंद केले आहेत. राज्य शासनाने दोन अध्यादेश काढले. परंतु, ते मान्य नसल्याने परत पाठवले आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम