मुख्यमंत्री तर मोदीमय झाले ; संजय राऊतांची टीका !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १६ ऑक्टोबर २०२३

ज्यांना बाळासाहेबांनी विरोध केला त्या सगळ्यांसोबत ते युती करतील, असा हल्लबोल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर केल्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील आता मुख्यमंत्री शिंदेंवर टीकास्त्र सोडले आहे.

संजय राऊत म्हणाले कि, तुम्ही आम्हाला मिलावट राम म्हणतात, तुमची सडलेली भेळपुरी झाली आहे, तुम्ही आम्हाला समाजवाद काय शिकवणार तर मुख्यमंत्री शिवसेनेचे न राहता मोदीमय झाल्याची टीका देखील त्यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांना समाजवाद हा शब्द तरी माहीत आहे का? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्र्यांना समाजवादाची व्याख्या विचारा. त्यांना बाळासाहेब आणि समाजवादी नेते यांचे काय संबंध होते ते विचारा. त्यांना विचारा नाथ पै यांचे नाव ऐकले आहे का ? मधु दंडवते यांच नाव माहीत आहे का? ज्या ठाण्यातून ते येतात त्या भागात जास्त समाजवादी लोक राहतात. भाजपच्या पदराखाली बसले आहेत त्यांना सत्ता देण्याचे काम हे समाजवादी नेत्यांनी केले असल्याचेही खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम