दर महिन्याला मिळणार पैसे ; या योजनेत करा गुंतवणूक !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १६ ऑक्टोबर २०२३

देशातील अनेक लोक दरमहिन्याला थोड्या फार प्रमाणात बचत करीत असतात. ज्यातून त्यांना भविष्यातील अनेक फायदे देखील मिळत असतात. तर आपल्या मुलांचे लग्न असो वां शिक्षणासाठी कर्ज घेण्याची गरज पडणार नाही म्हणून केद्र सरकार नेहमीच विविध योजनेच्या माध्यमातून जनतेला फायदा देत असतो. अशा लोकांसाठी पोस्ट ऑफिसची ही योजना खूप छान आहे. या योजनेत पैसा सुरक्षित ठेवण्यासोबतच बँकांच्या तुलनेत व्याजदरही जास्त आहे.

भारतातील पोस्ट ऑफिसशी गुंतवणूकदारांचे विश्वासाचे नाते आहे. तुम्हाला 5 वर्षांसाठी गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम (POMIS) तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर, तुम्हाला दरमहा एक निश्चित उत्पन्न मिळेल. तसंच तुमचे पैसे देखील पूर्णपणे सुरक्षित असतील. ही योजना National Savings Monthly Income Account (MIS) म्हणूनही ओळखली जाते.

जॉइंट अकाउंटमध्ये 15 लाख रुपये जमा करू शकता
तुम्ही पोस्ट ऑफिस मंथली सेव्हिंग स्कीम (MIS) मध्ये तुम्ही सिंगल अकाउंटच्या माध्यमातून किमान 1,000 रुपये आणि जास्तीत जास्त 9 लाख रुपये गुंतवू शकता. जॉइंट अकाउंटमध्ये जास्तीत जास्त पैशांची मर्यादा 15 लाख रुपयांपर्यंत आहे. म्हणजेच पती-पत्नी दोघे मिळून 15 लाख रुपयांपर्यंत जॉइंट अकाउंटमध्ये गुंतवणूक करू शकतात. रिटायर्ड कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना अतिशय फायदेशीर आहे. एका जॉइंट अकाउंटमध्ये जास्तीत जास्त तीन लोक गुंतवणूक करू शकतात.

इतकंच नाही तर तुम्ही या योजनेत अल्पवयीन व्यक्तीच्या नावावर रक्कम जमा करू शकता. परंतु अशा अकाउंटमध्ये 3 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येईल. या स्किममध्ये डिपॉझिटसाठी पोस्ट ऑफिसमध्ये स्वतंत्र POMIS फॉर्म भरावा लागेल. या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी ग्राहकाला पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडावे लागेल.

सध्या पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम मध्ये 7.4 टक्के वार्षिक व्याज उपलब्ध आहे. जे इतर फिक्स्ड डिपॉझिट आणि पर्यायांपेक्षा चांगले आहेत. POMIS फॉर्म भरताना, तुम्हाला ओळखपत्र, रेजिडेंशियल प्रूफ, 2 पासपोर्ट साइजचे फोटो आवश्यक असतील. नॉमिनी आवश्यक आहे.

स्किमचा कालावधी
या पोस्ट ऑफिस योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षांचा आहे. वेळेपूर्वी पैसे काढल्यास नुकसान सहन करावे लागू शकते. एका वर्षात पैसे काढण्याची तरतूद नाही. 3 वर्षापूर्वी पैसे काढल्यास 2% दंड भरावा लागेल. 3 ते 5 वर्षात पैसे काढल्यास 1 टक्के रक्कम वजा केली जाते.

या अकाउंटचे फायदे
तुम्ही हे अकाउंट एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये शिफ्ट करू शकता. 5 वर्षांची मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही रक्कम पुन्हा गुंतवू शकता. यामध्ये नॉमिनीची नियुक्ती केली जाऊ शकते. जेणेकरून कोणतीही अनुचित घटना घडल्यास नॉमिनीला रक्कम मिळू शकेल. एमआयएस योजनेत टीडीएस कापला जात नाही, परंतु व्याजावर टॅक्स भरावा लागतो.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम