रजनीकांतच्या एंट्रीने सनीचा होणार पत्ता गुल ?

बातमी शेअर करा...

बातमीदार | ८ ऑगस्ट २०२३ | यंदाचा ऑगस्टचा महिना हा मनोरंजन विश्वासाठी मोठा मानला जात असून चाहत्यांना देखील आता कोणता चित्रपट पाहावा असाच होणार आहे. या महिन्यात चारपेक्षा जास्त चित्रपट प्रदर्शित होणार असून ते बिग बजेट आहेत. त्यात मोठमोठ्या सेलिब्रेटींच्या भूमिका आहेत. त्यात सनी देओलचा गदर २, अक्षय कुमारचा ओह माय गॉड २ आणि रजनीकांत यांच्या जेलरकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

यासगळ्यात अक्षय कुमारचा ओएमजी २ आणि गदर २ मध्ये जोरदार फाईट होणार असल्याचे बोलले जात आहे. कारण हे दोन्ही चित्रपट अकरा ऑगस्टला प्रदर्शित होणार आहेत. आतापर्यत गदर २ आणि ओएमजी २ चे ट्रेलर, त्यातील गाणी प्रदर्शित झाली असून त्यामध्ये सनीचा गदर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे. त्याची चर्चाही सर्वाधिक आहे. बॉक्स ऑफिसवर गदर २ वरचढ ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे रजनीकांत यांच्या जेलरची मोठी हवा आहे. तो देखील याच महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. रजनीकांत यांचा चित्रपट केवळ भारतातच नाहीतर जगभरातील त्यांच्या चाहत्यांसाठी उत्सुकतेचा विषय असतो. गदर २ ची तर प्रदर्शनापूर्वीच ५० हजारांपेक्षा जास्त तिकीटांची बुकींग झाली आहे. तर ओएमजीची सुरुवात त्या तुलनेनं फारच कमी आहे. यात आता जेलरच्या अॅडव्हान्स तिकींटांच्या बुकींग बाबत एक अपडेट समोर आली आहे.

रजनीकांत यांचा एखादा चित्रपट प्रदर्शित होणं हे म्हणजे एखाद्या उत्सवासारखे असते. त्याचे होणारे सेलिब्रेशन याचीही चर्चा होते. त्यांच्या फोटोला दुधाचा अभिषेक, हारतूरे, थिएटर बाहेर रजनीकांत यांचे मोठे कटआऊट्स हे सारं चाहत्यांच्या परिचयाचे आहे. त्यामुळे याही वेळेस हा जल्लोष कायम राहणार यात शंका नाही. मात्र त्यांचा हा चित्रपट सनी आणि अक्षयसाठी डोकेदुखी ठरणार का हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम