दै. बातमीदार । २६ जानेवारी २०२३ । गेल्या दोन महिन्यापासून शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट वादग्रस्त चित्रीकरणामुळे चांगलाच चर्चेत आला होता तर काही संघटनांनी या चित्रपटावर बंदी आणावी यासह चित्रपटाविरोधात मोठ्या आंदोलन देखील झाले होते. पण याच चित्रपटाने पहिल्याच दिवशी बक्कळ पैसा कमविला आहे.
‘पठाण’ या चित्रपटाला रिलीजच्या पहिल्या दिवशी जबरदस्त ओपनिंग मिळाली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर तब्बल 55 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर जगभरात चित्रपटाने 100 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. ‘पठाण’ हा बॉलिवूडचा सर्वात मोठा ओपनिंग मिळणारा चित्रपट ठरला आहे. याआधी हृतिक रोशनच्या ‘वॉर’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी 51.6 कोटींचे कलेक्शन केले होते.
250 कोटींच्या बजेटमध्ये पठाणची निर्मिती करण्यात आली आहे. दुसऱ्या दिवशी भारतातील कमाईचा आकडा 100 कोटींच्या पुढे जाईल असा अंदाज वर्तवला जात आहे. हा चित्रपट जगभरात 8000 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. ‘पठाण’ रिलीजपूर्वी बराच वादात सापडला होता. चित्रपटातील बेशरम रंग या गाण्याविरोधात देशातील अनेक ठिकाणी निदर्शने झाली. गाण्यातील दीपिकाच्या पेहरावावर आंदोलकांनी आक्षेप घेतला. ‘पठाण’ने इतिहास रचत नवा विक्रम केला आहे. 55 कोटींच्या कलेक्शनसह हा हिंदी चित्रपटांमध्ये सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने KGF Chapter 2 च्या हिंदी व्हर्जनला मागे टाकले आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम