सरकारचा मोठा निर्णय : मद्यपींना बसणार फटका !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २२ ऑक्टोबर २०२३

परमिट रूममध्ये विक्री होणाऱ्या मद्यावर अतिरिक्त पाच टक्के ‘व्हॅट’ वाढवून राज्य सरकारने मद्यपींना चांगलाच झटका दिला. राज्य सरकारने यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला असून बार, क्लब आणि कॅफेमध्ये जाऊन मद्य पिणाऱ्या शौकिनांना आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. स्टार हॉटेल्समधील मद्याच्या दरावर मात्र याचा कोणताही परिणाम होणार नाही.

महाराष्ट्र सरकार नवीन उत्पादन शुल्क धोरण आणण्याच्या विचारात आहे. महसूल वाढीसाठी सरकारने बीयरचे दर कमी करण्यासंदर्भात समिती गठीत केली आहे. दुसरीकडे मद्याच्या दरात अतिरिक्त पाच टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. परमिट रूममध्ये मद्य सेवांसाठी व्हॅट दर सध्या पाच टक्के आहे. तो आता दहा टक्क्यांपर्यंत वाढवला जाणार आहे. त्यामुळे बार, क्लब आणि कॅफेमध्ये जाऊन मद्याचा आस्वाद घेणाऱ्या मद्य शौकिनांना अतिरिक्त पैसे मोजावे लागतील.

वित्त विभागाने एक अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार महाराष्ट्रात १ नोव्हेंबरपासून बार, क्लब आणि कॅफेमध्ये दिल्या जाणाऱ्या मद्याच्या किमतीत वाढ होणार आहे. सरकारने व्हॅटमध्ये वाढ केल्यानंतर बारचालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. आधीच अबकारी परवाना शुल्क वाढवल्याने व्यवसायावर ताण आला आहे. आता व्हॅटमध्ये ५ टक्क्यांची वाढ केल्यानंतर व्यवसायावर परिणाम होईल, असे बार, क्लब आणि कॅफेमधील मद्यविक्री करणाऱ्या व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम