बातमीदार | १५ सप्टेंबर २०२३ | गेल्या काही वर्षाआधी जगभारत कोरोनाचा मोठा हाहाकार मजला होता त्यानंतर जग यातून सावरत असतानाच निपाह व्हायरसने डोकेदुखी वाढवली आहे. निपाह व्हायरसच्या रुग्णांची संख्या केरळमध्ये दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. केरळ सरकारनेही यासंदर्भात अलर्ट जारी केला आहे. तामिळनाडूसह कर्नाटकने खबरदारीचा उपाय म्हणून अलर्ट जारी केला आहे.
केरळमध्ये निपाह व्हायरसची वाढती रुग्णसंख्या पाहता, तामिळनाडू सरकारने एक परिपत्रक जारी केले आहे. लोकांना केरळच्या ज्या भागात रुग्णसंख्या जास्त प्रमाणात आहे. त्या भागात अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
कर्नाटक सरकारच्या आरोग्य विभागाने केरळच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये (कोडागू, दक्षिण कन्नड, चामराजनगरा आणि म्हैसूर) आणि केरळपासून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या टोल नाक्यांवरील तपासणीतही वाढ करण्यात आली आहे. केरळमधील आरोग्यमंत्र्यांच्या कार्यालयाने माहिती देताना सांगितले की, कोळीकोड येथील रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेल्या ३९ वर्षीय व्यक्तीमध्ये निपाह विषाणू आढळून आला आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम