राज्यात पावसाचा जोर मंदावला; अनेक ठिकाणी ‘यलो अलर्ट’ घोषित

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० सप्टेंबर २०२२ । पावसाळ्याचा परतीचा प्रवास सुरू झाला असून, राज्यातील बऱ्याचशा भागात पावसाच्या सरी ओसरल्या आहे. मागील काही दिवसांत संपूर्ण देशभरात पावसाने हाहाकार माजवल्याने अनेक भागात पूरसदृश परिस्थितीदेखील निर्माण झाली होती. मात्र, राज्यात सोमवारपासून पावसाचे प्रमाण काहीसे कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सध्या पुणे, मुंबईसह ठाणे परिसरात दमदार पाऊस आहे. याचबरोबर, पालघर, नंदूरबार, औरंगाबाद या जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला. तर सकाळी पहाटेपासून पुण्यासह इतर परिसरांत पावसाच्या सरी थांबण्याचे नाव घेत नाही आहे.

भारतीय हवामान विभाग (IMD) च्या माहितीनुसार, राज्यात आजही पावसाची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे विदर्भ, मराठवाडा, पुणे, सोलापूर इत्यादी जिल्ह्यांत ‘यलो अलर्ट’ घोषित करण्यात आला असून, प्रशासनाने नागरिकांना सावध राहून सतर्कतेचा इशारा दिला आहे.

परंतु, २१ सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कमी असल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. भारतातील वायव्य भागाच्या राज्यांमध्ये पावसाच्या परतीसाठी अनुकूल वातावरण असल्याने मान्सून परतणार असल्याची माहिती हवामानतज्ज्ञांनी दिली आहे.

या पावसामुळे जायकवाडी धरण तब्बल ३१ वर्षानंतर ओव्हरफ्लो झाले आहे. गतवर्षीच्या प्रमाणापेक्षा यंदा ११ मोठ्या प्रकल्पात जादा जलसाठा आहे. रविवारी या धरणाचे २७ दरवाजे उघडून विसर्ग करण्यात आला. याचबरोबर माजलगाव येथे ७८% जलसाठा झाला असून, मांजरा येथे केवळ ८७% उपयुक्त जलसंचय झाला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम