‘द केरळ स्टोरी’ला तुफान प्रतिसाद केली इतकी कमाई !
दै. बातमीदार । ८ मे २०२३ । देशाचे पंतप्रधान मोदी यांनी ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट पाहण्याचे देशवासियांना आवाहन केले होते. पण हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच मोठ्या वादात सापडला होता, तर चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. अनेक वाद आणि विरोध झाल्यानंतर ‘द केरला स्टोरी’ चित्रपट 5 मे रोजी सिनेमागृहात रिलीज झाला.
या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. केरला स्टोरीमध्ये अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्दी इधानी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पहिल्या दिवशी चित्रपटाने चांगली सुरुवात केली. चित्रपटाने दुसऱ्या दिवशीही चांगला व्यवसाय केला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 7 कोटींहून अधिक व्यवसाय केला. तिसऱ्या दिवशीची याची घौडदौड सुरुच असुन द केरळ स्टोरीने तिसऱ्या बॉक्स ऑफिसवर 16 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
‘बॉक्स ऑफिस इंडिया’च्या रिपोर्टनुसार, सुदीप्तो सेन दिग्दर्शित या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्दी इधानी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. द केरळ स्टोरीने आपल्या पहिल्या वीकेंडमध्ये भारतीय बॉक्स ऑफिसवर 33.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. देशभरात सुमारे 1300 स्क्रीन्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. विवेक अग्निहोत्रीच्या ‘द कश्मीर फाईल्स’ प्रमाणेच अनेक सिनेमा हॉलमध्ये शो सुरू असतानाही चित्रपटाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली जात आहे. चित्रपट ‘द केरळ स्टोरी’ रिलीज होण्यापूर्वीच वादात सापडला होता, तर चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. साधारणत: रविवारी एखाद्या चित्रपटाची कमाई 30% वाढली तर चित्रपटगृहांमध्ये तो दीर्घ खेळी खेळेल असे समजते. पण ‘द केरळ स्टोरी’चे आकडे सांगत आहेत की ती ‘द काश्मीर फाइल्स’पेक्षा चांगली स्थितीत आहे. द केरळ स्टोरीने आपल्या पहिल्या वीकेंडमध्ये भारतीय बॉक्स ऑफिसवर 33.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम