उर्फी जावेद होती या अभिनेत्याच्या प्रेमात पण रडली ढसाढसा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ८ मे २०२३ ।  राज्यात आपल्या वेगळ्या लुकमुळे चर्चेत आलेली उर्फी जावेद हिला मुंबई विमानतळावर पाहून चाहत्यांनी मोठी गर्दी केली. पापाराझीला पोझ देताना उर्फी जावेद दिसत होती. चाहत्यांची वाढती गर्दी पाहून उर्फी जावेद हिने चक्क 10 फोटोसाठी 100 रूपये लागतील असे सांगितले. मात्र, उर्फी जावेद हे फक्त मजाकमध्येच म्हणत होती. उर्फी जावेद दिसताच लोक कायमच तिच्या शेजारी गर्दी करताना दिसतात.

नुकताच उर्फी जावेद हिने अत्यंत मोठा खुलासा केला आहे. उर्फी जावेद म्हणाली की, मी एका बाॅलिवूड अभिनेत्यावर प्रचंड प्रेम करत होते. माझे क्रेझ तो अभिनेता होता. विशेष म्हणजे यावेळी उर्फी जावेद हिने चक्क त्या अभिनेत्याचे नाव देखील सांगून टाकले. शाहिद कपूर हा उर्फी जावेद हिला प्रचंड आवडत असे. उर्फी जावेद त्याचे प्रत्येक चित्रपट बघायची.

उर्फी जावेद म्हणाली, ज्यावेळी मला समजले की, शाहिद कपूर याचे लग्न झाले. त्यादिवशी मी सारखी रडत होते आणि मी खूप जास्त दु:खी झाले. मी अजूनही शाहिद कपूर याला लाईक करते. आयुष्यात सर्वात जास्त दु:ख हे शाहिद कपूर याच्या लग्नाच्या दिवशीच झाले होते. आता उर्फी जावेद हिने शाहिद कपूर याच्याबद्दल भाष्य केल्याने ती चर्चेत आलीये.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम