रमजान ईदच्या शुभपर्वावर बंधुभावाचा संदेश आत्मसात करावा – माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा

राणा फाउंडेशनच्या वतीने आयोजित ईद मिलन कार्यक्रमात हिंदु-मुस्लीम बांधवांनी घडविले राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | १२ एप्रिल २०२४ | रमजान ईद उल फित्र राष्ट्रीय एकात्मता, अखंडता आणि बंधुभावाचा संदेश देते रमजान ईद आनंद, शांतता आणि सुख समृध्दीची कामना व्यक्त करणारी आहे. प्रत्येक मनुष्याने मानवतेचे नाते घट्ट करुन ईद च्या या शुभपर्वावर प्रामाणिकता आणि दयेचा संदेश जगभर पसरविला पाहिजे. हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या मानवतावादी संदेशाचे स्मरण करुन देणारी रमजान ईद असुन त्यांना अभिप्रेत असलेल्या सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचा संदेश सर्वांनी आत्मसात करावा असे आवाहन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले. गुरुवार दि.११ एप्रिल २०२४ रोजी खामगांव शहरात रमजान ईद उल फित्र उत्साहपुर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. रमजान ईद निमित्त दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी राणा फाउंडेशनच्या वतीने टिळक राष्ट्रीय विद्यालयाच्या प्रांगणासमोर माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या अध्यक्षतेखाली ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विश्वपालसिंह जाधव,लोकमित्र सोपान गाडेकर गुरुजी, माजी नगराध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने,खामगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज वानखडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सुभाष पेसोडे, अंजुमन एज्युकेशनल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. वकारउलहक खान, ॲड.टी.एम.हुसैन, माजी न.प.उपाध्यक्ष सैयद गणी, पत्रकार फारुक, हाजी शेख उस्मान, समीसेठ कुरेशी, आसीफ अन्सारी, हाजी अलीम, बाजार समितीचे संचालक मंगेश इंगळे, माजी नगरसेवक किशोरआप्पा भोसले, माजी नगरसेवक दिनेश अग्रवाल, खामगाव विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष रोहित राजपुत, काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष बबलु पठान, मोहन परदेसी, प्रितम माळवंदे, जसवंतसिंग शिख, गजानन राऊत आदी उपस्थित होते.

पुढे बोलतांना राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, पवित्र रमजान महिन्यात मुस्लीम समाज बांधव रोजा ठेवुन अल्लाहकडे प्रार्थना करतात. या महिन्यात रोजे ठेवणाऱ्यांना खुप पुण्य मिळते. मनुष्याला दुसऱ्याची मदत करण्याचा मार्ग दाखविल्या जातो. पवित्र रमजान महिन्यात सर्वांनी अल्लाहाकडे केलेल्या प्रार्थना,मनोकामना पुर्ण होवो असे सांगुन त्यांनी मुस्लीम समाज बांधवाना अलींगन देउन ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या. सर्वप्रथम सकाळी ९ वाजता सजनपुरी येथील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लीम समाज बांधवांनी नमाज पठन केली. त्यानंतर आयोजित ईद मिलन कार्यक्रमात माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी मुस्लीम समाज बांधवांना अलींगन देउन शुभेच्छा दिल्या. हम सब एक है या घोषणेने परिसर दणाणुन गेला होता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम