आपल्याला विचार आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे, याचे श्रेय महात्मा ज्योतिबा फुले यांना द्यावे लागेल – डॉ. निर्मला जाधव

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | १२ एप्रिल २०२४ | महात्मा फुले यांचे विचार आणि कार्य क्रांतीदर्शी स्वरूपाचे आहे. आज आपण मुक्तपणे जगतो आहोत अभिव्यक्त होतो आहोत. आपल्याला विचार आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे. याचे श्रेय महात्मा ज्योतिबा फुले यांना द्यावे लागेल. असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ताराबाई शिंदे अध्यासन केंद्राच्या प्रमुख डॉ. निर्मला जाधव यांनी व्यक्त केले.

मूळजी जेठा महाविद्यालयाच्या वतीने महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती दिनानिमित्त आयोजित केलेल्या समता पर्व या उपक्रमात महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त्त व्याख्यानाप्रसंगी ” महात्मा फुले व्यक्तित्व आणि कर्तृत्व” या विषयावर प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या.

 

अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय भारंबे होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, महात्मा फुले हे खऱ्या अर्थाने क्रांतीसूर्य होते. समाजातील अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा या विरोधात त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला आणि समाजाला दिशा देण्याचे कार्य केले. त्यांच्यामुळेच आज आपण सुखकर आयुष्य जगतो आहोत, याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. सर्वांनी सामाजिक कार्यासाठी प्रवृत्त झाले पाहिजे. सुधारकांनी दिलेले विचार आणि त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आपण काम केले, तर आपण निश्चितपणे विकसित राष्ट्र म्हणून पुढे येऊ, असेही त्यांनी सांगितले.

सूत्रसंचालन डॉ. विलास धनवे यांनी केले. या वेळी विचारमंचावर भाषा प्रशाळा संचालक प्रा. भूपेंद्र केसूर व सामाजिकशास्त्रे प्रशाळा संचालक प्रा. देवेंद्र इंगळे, निवृत्त प्रा. डॉ. चंद्रमणी लभाने, प्रा. केतन नारखेडे, परीक्षा नियंत्रक डॉ. लीना ढाके व विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम