थेट मंत्रीपदाची होती पवारांकडून ऑफर ; अनिल देशमुख !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १० जुलै २०२३ ।  राज्यात अजित पवारांना राष्ट्रवादीच्या 54 आमदारांपैकी 30 आमदारांनी पाठिंबा दिला आहे. 30 आमदार शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. नऊ आमदारांनी रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार शिवसेना- भाजप सरकारमध्ये सामील झाले आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली आणि पुन्हा पक्षबांधणीसाठी ते राज्याच्या दौऱ्यावर गेले आहेत.

यादरम्यान अजित पवार यांना पाठिंबा देणाऱ्या नेत्यांनी तसेच शरद पवार यांना पाठिंबा देणाऱ्या नेत्यांनीही अनेक गौप्यस्फोट केले आहेत. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना अजित पवार गटाकडून मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली होती. प्रफुल पटेल यांनी अनिल देशमुख यांना संपर्क साधला होता. शपथविधी दिवशी प्रफुल पटेल यांच्याकडून अनिल देशमुख यांना दोन वेळा फोन केल्याची माहिती आहे.याबाबतची माहिती खुद्द अनिल देशमुख यांनी दिली आहे. प्रफुल पटेल यांनी अनिल देशमुख यांना दोन वेळा फोन केला होता. शपथ विधीच्या दिवशी त्यांना 2 वेळा फोन केला होता असं अनिल देखमुख यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. तर तुम्हालाही अजित पवार गटाकडून त्यांच्या गटात येण्यासाठीची ऑफर होती का या प्रश्नावर उत्तर देताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. “मी तिकडे गेलो नाही म्हणून इथे आहे, असं अनिल देशमुख यावेळी म्हणालेत. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा वरिष्ठ नेता असल्यामुळे अजित पवार यांच्याकडून मलाही ऑफर आली होती. पण मी तिकडे गेलो नाही असंही ते म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम