बातमीदार \ १८ नोव्हेबर २०२३
देशभरात दसरा पाठोपाठ दिवाळी सण आला असतांना सोन्यासह चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती अशाच वेळी अनेक नागरिकांनी सोन्यासह चांदीच्या खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी केली होती पण सध्या दिवाळी झाल्यावर देखील सोन्याच्या दरात घसरण होत आहे. त्यामुळे आज देखील बाजारात गर्दी सुरूच आहे.
आखाती देशातील युद्धामुळे सोन्याचा दरांने ६२ हजारांचा आकडा ओलांडला होता. आज सोन्याचा दरात ५०० रुपयांनी घट झालेली पाहायला मिळाली. तर चांदीच्या दरातही घसरणही झाली आहे. गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,६७० रुपये तर २४ कॅरेटनुसार १ तोळ्यासाठी ६१,७९० रुपये मोजावे लागणार आहे. आज सोन्याच्या भावात घसरण झाल्यामुळे ग्राहकांना कमी पैसे मोजावे लागणार आहे. आज १ किलो चांदीसाठी ७६,००० रुपये मोजावे लागणार आहे.
मुंबई- ६१, ६९० रुपये
पुणे – ६१, ६९० रुपये
नागपूर – ६१, ६९० रुपये
नाशिक- ६१,७२० रुपये
ठाणे – ६१, ६९० रुपये
अमरावती – ६१, ६९० रुपये
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम