जिल्ह्यातील अल्पभूधारक कर्जबाजारी शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
बातमीदार | १८ नोव्हेबर २०२३
भडगाव तालुक्यातील कजगाव येथील अल्पभूधारक कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्याने कजगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बस्थानक परिसरातील सावता माळी चौकातील शिवाजी नथ्थू महाजन ( वय ४५) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे २ एकर शेती असून त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे. मात्र, अशा कष्टाळू शेतकऱ्याच्या आत्महत्येने समाजमन सुन्न झाले असूने दिवाळी होऊन २ दिवस होत नाहील, तोच झालेल्या या घटनेने कजगाव परिसरात शोक व्यक्त होत आहे. पावसाने मारलेल्या दांडीने बळीराजा मेटाकुटीला आला आहे. शेतातील उत्पन्न ७० टक्यांपेक्षा अधिक घटल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे घेतलेले कर्ज दिवसेंदिवस वाढत आहे. कर्ज फेडण्याची शक्यता समोर दिसत नसल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेऊन स्वतःचे जीवन संपवले. मयत शेतकऱ्यावर सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, २ मुली, मुलगा, भाऊ असा परिवार आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम