राज्याला सर्वाना सोबत घेणार नेतृत्व हवे ; पंकजा मुंडे !
बातमीदार | २५ ऑक्टोबर २०२३
राज्यात दसरा मेळाव्याला भगवान भक्तीगडावरील मेळावा नेहमीच चर्चेत येत असतो. यंदा देखील हा मेळावा चर्चेत आला आहे. २४ ऑक्टोबर रोजी सावरगाव घाट (ता. पाटोदा) येथील भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे बोलत होत्या. यावेळी खा. डॉ. प्रितम मुंडे, सुजय विखे, आ. सुरेश धस, मोनिका राजळे, मेघना बोर्डीकर, डॉ. रत्नाकर गुट्टे, नमिता मुंदडा, रमेश आडसकर, अॅड. यशश्री मुंडे, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के आदींची यावेळी उपस्थिती होती.
पंकजा मुंडे म्हणाले कि, आता मी मैदानात उतरले. तुमची इच्छा असेल तर मला कोणीही घरी बसवू शकणार नाही. मी शिवशक्ती परिक्रमा केलेल्या नगर, जळगाव, नाशिक, सिन्नर, येवला आणि सिंदखेड राजाला जिजाऊंच्या दर्शनाला येणार असल्याचे सांगत राज्यात सर्वांना सोबत घेणारं, कुरवाळणारं नेतृत्व हवं आहे, असे प्रतिपादन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केले.
पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, यावेळी मजुरीत वाढ झाल्याशिवाय ऊसतोड मजूर फडात जाणार नाहीत. सरकारकडे शेतकऱ्यांना, मजुरांना द्यायला काही नाही, असा हल्लाबोलही त्यांनी केला. मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर झाला आहे, ओबीसींच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. समाजाचा सरकारकडून अपेक्षाभंग होत असून आता समाज अपेक्षाभंग सहन करू शकणार नाही, असा इशाराही पंकजा मुंडे यांनी दिला. आपण पडलो, मात्र थकलो नाही. तुमच्या सेवेत खंड पडला, त्याबद्दल माफ करा, असे म्हणत प्रत्येक वेळी तुमचा अपेक्षाभंग झाला (पंकजा मुंडेंना विधान परिषद किंवा राज्यसभेवर घेण्याबाबत), याबद्दलही माफी मागते. दरवेळी स्वप्न भंगले तरी तुमच्या नजरेत नवे स्वप्न निर्माण होते, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम