सणासुदीच्या तोंडावर साखरेची गोडवा वाढला !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २५ ऑक्टोबर २०२३

गेल्या दहा दिवसापासून नवरात्र सुरु होती तर नुकताच दसरा हा सन देखील मोठ्या उत्साहात झालेला असतांना येत्या काही दिवसावर दिवाळी हा सन येवून ठेपला आहे. तर गेल्या दोन महिन्यांपूर्वी किरकोळ बाजारात साखरेचे दर ४० रुपये किलो होते. त्यामध्ये पुन्हा सहा रुपयांची किलोमागे वाढ झाली असून ४६ रुपये किलो साखरेचा दर झाला आहे.

एपीएमसी घाऊक बाजारात गणेशोत्सवात साखरेचे दर किलोमागे एक ते दीड रुपयांपर्यंत वाढ झाली होती. आता पुन्हा किलोमागे दोन रुपयांची दरवाढ घाऊक बाजारात झाली आहे. किरकोळ बाजारात त्याचा परिणाम दिसून आला. ३८ ते ३९ रुपये किलो विक्री होणारी साखर गणेशोत्सवात ४२ रुपये किलोपर्यंत पोहोचली होती. आता दसऱ्याच्या सणासुदीच्या काळात पुन्हा त्यात सहा रुपयांची किलोमागे वाढ होऊन साखर किरकोळ बाजारात ४६ रुपयांवर पोहोचली आहे. दुष्काळ व उत्पादनात झालेली घट यामुळे साखरेच्या दरात वाढ होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम