शेअर बाजार राहणार बंद : वाचा काय आहे कारण !
बातमीदार | १४ नोव्हेबर २०२३
देशभर दिवाळीच्या सणाचा उत्साह सुरु आहे तर या आठवड्यात शेअर बाजार आणखी एक दिवस बंद राहणार आहेत. दिवाळीनंतर, दिवाळी बलिप्रतिपदेच्या मुहूर्तावर, आज मंगळवारी 14 नोव्हेंबर 2023 रोजी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टीवर शेअर बाजारात कोणताही व्यवहार होणार नाही.
नोव्हेंबर 2023 मध्ये शेअर बाजाराला दोन दिवस सुट्ट्या आहेत – 14 नोव्हेंबरला दिवाळी बलिप्रतिपदा आणि दुसरी 27 नोव्हेंबर रोजी गुरु नानक जयंतीनिमित्त. या वर्षातील सुट्ट्यांवर नजर टाकली तर एप्रिल महिन्यात सर्वाधिक तीन सुट्ट्या होत्या.
आता हे वर्ष संपायला जेमतेम दीड महिना उरला आहे. या काळात शेअर बाजारात आणखी एक सुट्टी असणार आहे, ती म्हणजे ख्रिसमस. 25 डिसेंबर 2023 रोजी शेअर बाजार बंद असणार आहे. सोमवारी शेअर बाजारात घसरण झाली आणि BSE सेन्सेक्स 325 अंकांपेक्षा जास्त घसरणीसह बंद झाला. बीएसई सेन्सेक्स 325.58 अंकांनी घसरून 64,933.87 अंकांवर बंद झाला. व्यापारादरम्यान तो 406.09 अंकांनी घसरला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 82 अंकांनी घसरून 19,443.55 अंकांवर बंद झाला.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम