विद्यार्थ्याने दिला मराठा आरक्षणाबाबत परीक्षेच्या पेपरवर मोलाचा सल्ला !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ४ नोव्हेबर २०२३

मनोज जरांगे पाटील दहा दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बसले होते मात्र गुरुवारी त्यांचे उपोषण सुटले असले तरी राज्यात अजून देखील साखळी उपोषण सुरु आहे. यासाठी तरुण आणि जाणकार माणसांसह अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनीही आंदोलन केलं आहे. आपल्या पुढील भविष्यासाठी आरक्षण मिळावे म्हणून काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी आरक्षण मिळत नाही तोवर शाळेत जाणार नाही, असं आंदोलन केलं होतं. अशात आता सहामाही परीक्षेत एका विद्यार्थ्याने पहिल्याच पानावर मराठा आरक्षणाबाबत एक मोलाचा संदेश लिहिलाय.

विद्यार्थ्याने आपल्या पेपरच्या पहिल्याच पानावर ‘एक मराठा कोटी मराठा’ लिहून पेपर लिहिण्यास सुरूवात केली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळमधील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री गणेश विद्यालयमध्ये ही घटना घडलीये.

बारावीत शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याने सहामाहीचा पेपर सोडविताना चक्क एक मराठा कोटी मराठा असं लिहून सुरुवात केली. सध्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये सर्वत्र हायस्कूलमध्ये सहामाहीचे पेपर चालू आहेत. सगळीकडे मराठा आरक्षणाच्या संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने करून निषेध व्यक्त केला जातोय. त्यामुळे बीबीदारफळ येथील संकेत लक्ष्मण साखरे या विद्यार्थ्याने सहामाही परीक्षेतील राज्यशास्त्राचा पेपर दिला. पेपरची सुरुवातच त्याने चक्क ‘जय जिजाऊ, जय शिवराय जय शंभुराजे,एक मराठा कोटी मराठा असं लिहून केली. त्यामुळे जिल्हाभरात या पेपरची चर्चा होत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम