तिकीट वेटिंगला आहे, टीसीला नका विचारू !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १२ मे २०२३ ।  सध्या राज्यात प्रंचड उन्हाचा कडाका वाढल्याने अनेक लोकांनी आता हॉलिडे ट्रीपचा प्लान करीत आहे पण अनेकांना कुठेही जाण्यासाठी रेल्वेनेच प्रवास करावा लागत असतो. पण अचानक ठरलेल्या ट्रीपवर तुम्हाला रेल्वेचे आरक्षण लागलीच मिळणे शक्य नाही. त्यामुळे तुम्हाला मनस्ताप होवू शकतो. गाडीत टीसीच्या मागे फिरावे लागते. मात्र, आता प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. काेणत्या डब्यात किती जागा रिकाम्या आहेत, ही माहिती प्रवाशांना चार्ट तयार झाल्यानंतर मिळणार आहे. यासाठी आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर नवी सुविधा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

नवी सुविधा सुरू झाल्यानंतर प्रवाशांना माेबाइलवर रिक्त जागांची यादी उपलब्ध हाेणार आहे. आयआरसीटीसीवरून आरक्षित तिकिटे घेतानाच ‘गेट ट्रेन चार्ट’ हा पर्याय निवडण्याचा पर्याय मिळेल. नवी सुविधा सुरू झाल्यानंतर आयआरसीटीसीकडून आलेल्या एसएमएसमधील लिंकवर क्लिक केल्यास चार्ट मिळू शकेल. या सुविधेसाठी किती शुल्क लागेल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. शुल्क आकारल्यास ५ ते १० रुपयांपेक्षा जास्त राहणार नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. सध्या आआरसीटीसीच्या वेबसाइटवर ट्रेनचा चार्ट मिळविण्याची सुविधा आहे. मात्र, माेबाइलवर ही माहिती मिळत नाही. त्यामुळे प्रवासी टीसीवर अवलंबून असतात.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम