ट्विटरचे सीईओ मस्क जाणार महिला घेणार पदभार !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १२ मे २०२३ ।  जगभरात गेल्या काही दिवसापासून ट्विटरचे CEO नेहमी चर्चेत येत आहे. त्यांनी घेतलेले वेगवेगळे निर्णय हे आश्चर्यकारक असल्याने तर आता ते या पदावर असणार नाही अशा बातम्या सध्या सुरु झाल्या आहे. त्यानंतर त्यांनी गुरुवारी रात्री घोषणाच केली आहे.

एलन मस्क यांनी सांगितले की त्यांना ट्विटरचा नवीन सीईओ मिळाला आहे. यासाठी त्यांनी एका महिलेची निवड केली आहे. ती येत्या 6 आठवड्यांत कंपनीत रुजू होईल. मात्र, मस्क यांनी त्यांच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. मस्क यांनी ट्विट केले की ते स्वतः ट्विटरचे कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी असतील. मस्क अनेक दिवसांपासून ट्विटरसाठी नवीन सीईओच्या शोधात होते. सीईओ पद सोडायचे का, असा प्रश्न त्यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एका सर्वेक्षणाद्वारे लोकांना विचारला होता. या मतदानावर 57.5% लोकांनी त्यांना पद सोडण्याचा सल्ला दिला होता. यानंतर मस्क म्हणाले होते की, मला या कामासाठी कोणी मिळताच मी राजीनामा देईन.

एलन मस्क यांनी 15 फेब्रुवारी 23 रोजी सांगितले की त्यांना या वर्षाच्या अखेरीस ट्विटरसाठी नवीन सीईओ मिळण्याची आशा आहे. दरम्यान, मस्कने आपल्या कुत्र्याचे फ्लोकीचे फोटो ट्विटरवर शेअर केले आणि विनोदाने त्याला ट्विटरचे नवे सीईओ म्हटले. मस्कने फ्लोकीचे फोटो शेअर करत लिहिले, ‘ट्विटरचे नवीन सीईओ अप्रतिम आहेत. ते इतरांपेक्षा खूप चांगले आहे. हे नंबर्ससह देखील चांगले आहे आणि खूप स्टाइलिश देखील आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम