अखेर मुहूर्त ठरला : आज होणार खाते वाटप !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १३ जुलै २०२३ ।  राज्यातील एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री असलेले नुकतेच दिल्ली दौऱ्यावरून राज्यात परत आले असून दिल्लीत ठरल्याप्रमाणे आज राज्यातील खाते वाटप होणार असून मात्र मंत्रीमंडळ विस्तार पावसाळी अधिवेशनानंतर होणार असल्याची बातमी बाहेर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन जवळपास १० दिवसांचा काळ उलटला. मात्र, अद्यापही नवीन सरकारच्या खातेवाटपाचा तिढा अद्याप सुटला नाही. मंत्रीपदावरून तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून रस्सीखेच सुरू आहे. अशातच खातेवाटप आणि राज्य मंत्रिमंडळाच्या तिसऱ्या विस्तारासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे.

पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता मावळली आहे. सगळ्यात पक्षातील नेते विस्ताराकडे लक्ष लावून बसले आहेत यावेळी पण आमदार पदरी नाराजा येण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाचे रखडलेले खाते वाटप अधिवेशनाआधी मार्गी लागण्याची शक्यता आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी काल बुधवारी (12 जुलै) रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांनी अमित शाह यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा केल्याची माहीती आहे. या चर्चानंतर राज्याचं अर्थखातं राष्ट्रवादीकडे येईल अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. तर खाते वाटपवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर आता दोन गट निर्माण झाले आहेत तर याबाबतची न्यायालयीन लढाई राष्ट्रवादीला लढावी लागणार आहे, यासंबधी चर्चा अमित शाह यांच्या बैठकीत झाल्याची माहिती आहे. तर राज्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शपथ घेतल्यापासून त्यांना कोणती खाती मिळणार याबाबत चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अर्थखात मिळण्याबाबत राष्ट्रवादी आग्रही असल्याची माहिती आहे. अजित पवार आणि अमित शाह यांच्या बैठकीत अजित पवार यांनी याबाबत चर्चा केली असून भाजप राष्ट्रवादीला अर्थखात देण्यास तयार आहे मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम