आजचे राशीभविष्य, शनिवार २४ सप्टेंबर २०२२

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | २४ सप्टेंबर २०२२ | मेष – नोकरीच्या नवीन संधी चालून येतील. वाहन खरेदीची इच्छा मनात येईल. मुलांबाबतची चिंता दूर होईल. आपली प्रतिभा सिद्ध करण्याची संधी मिळेल.

वृषभ – मनाची चलबिचलता जाणवेल. विचार भरकटू देऊ नका. दिवस मध्यम फलदायी असेल. वादाचे मुद्दे टाळावेत.

मिथुन – अकारण खर्च टाळावा. संमिश्र घटनांचा दिवस. कामात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. वातावरण लक्षात घेऊन काम करावे.

कर्क – कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. नवीन व्यवसायास गती मिळेल. तुमचा मान वाढेल.

सिंह – चोख हिशोब ठेवावा. पैसा चांगल्या कामासाठी खर्च कराल. मान, सन्मानात वाढ होईल.

कन्या – लोकांकडून वाहवा मिळवाल. उत्तम सामाजिक दर्जा प्राप्त होईल. कामाचा ताण जाणवू शकतो. अति विचार करण्यात वेळ वाया घालवू नका.

तूळ – स्वत:च्या सुखासाठी पैसा खर्च कराल. प्रतिपक्षावर मात कराल. धनलाभाचे योग जुळून येतील.

वृश्चिक – मित्रांशी जवळीक साधाल. मुलांची चिंता लागून राहील. क्रोधावर नियंत्रण ठेवावे. अधिकार्‍यांची गाठ पडेल.

धनू – पैशाच्या बाबतीत हात आखडता घ्याल. जि‍भेवर ताबा ठेवावा. आर्थिक बाजू सुधारेल.

मकर – जुन्या विचारांना मनातून काढून टाका. भावंडांशी मतभेदाची शक्यता. दिवस मध्यम फलदायी.

कुंभ – मानसिक स्वास्थ्य ढळू देऊ नका. सट्टा, जुगारापासून दूर रहा. नवीन संधी मिळण्याची चिन्हे दिसू लागतील.

मीन – मानसिक ताण घेऊ नये. कार्य व अधिकार वाढतील. कौशल्याचा वापर करावा लागेल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम