पक्षाचे चिन्ह गेल्याचा गद्दारांना आनंद ; पौळ यांनी शीतल म्हात्रेंवर सोडले टीकास्त्र

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १० ऑक्टोबर २०२२ । मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी जे कृत्य केले आहे, त्या कृत्याबद्दल महाराष्ट्रातील जनता या गद्दारांना केराची टोपली दाखवेल, ठाकरे गटाचे चिन्ह गेल्याचे पाहून या गद्दारांना आनंद कसला होतोय? असे म्हणत युवासेनेच्या नेत्या अयोध्या पौळ यांनी शीतल म्हात्रेंवर टीकास्त्र सोडले आहे. यावेळी त्यांनी शिंदे गटावरही चांगलाच हल्लाबोल चढविला आहे.

ज्या पक्षाने या ४० आमदारांना मोठे केले त्याच पक्षाचे चिन्ह गेल्यावर यांना सर्वांना आनंद होत आहे तो कसला असा सवाल अयोध्या पौळ यांनी उपस्थित केला आहे. आगामी काळात शिवसैनिक आणि जनता गद्दारांना केराची टोपली दाखवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना अयोध्या पौळ यांनी शीतल म्हात्रेंना टोले लगावले आहेत. ज्या शिवसेना नावामुळे तुमचे अस्तित्व होते, ते गेल्याचा कसला आनंद असा सवालही त्यांनी म्हा़त्रेंना केला आहे. तर आता शिवसेना वाचविण्यासाठी आम्ही हे केले असे कोणत्या तोडाने म्हटणार अहात असा प्रश्न पौळ यांनी उपस्थित केला ओह. तर स्वाभिमान गेला, विचार गेले हे सगळे गेल्यावर हाती काय आले तर खोके, दिल्लीची पायचाटी, अन् नागपूरची स्क्रिप्ट असा टोला त्यांनी शिंदे गटावर केला आहे.

शीतल म्हात्रेंचे ट्विट काय?
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारापासून शिल्लकसेना दूर गेली आहे म्हणूनच पक्षाचे नाव आणि चिन्ह तुमच्यापासून दूर गेले असावे. विचार गोठले आहेत म्हणूनच कदाचित चिन्ह देखील गोठले असावे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम