दै. बातमीदार । १८ जुलै २०२३ । जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून दुचाकी चोरी घटनामध्ये सातत्याने वाढ होत असतांना जळगाव जिह्यातील पोलीस यंत्रणेकडून कसून चौकशी करून देखील येत आहे. दोन दिवसापूर्वी जळगाव शहर पोलिसांनी दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून सहा चोरीच्या दुचाकी जप्त केल्याची घटना ताजी असतांना जिल्हा पेठ पोलिसांनी एकास ताब्यात घेत त्याच्याकडून ५ दुचाकी जप्त केल्याची घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्हा पेठ पोलिसांनी सोमवारी एरंडोल येथून ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत केल्या असून, जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे संशयित आरोपी एका खासगी कंपनीत रिकव्हरी एजंटचे काम करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. चंद्रकांत रामदास साळुंखे (वय ४२, रा. हिराशिवा कॉलनी) असे अटकेतील संस्थेत आरोपीचे नाव आहे. यासंदर्भात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा शोध घेत असताना चंद्रकांत साळुंखे हाच दुचाकींची चोरी करीत असल्याचे समोर आले.
जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाच्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे संशयित आरोपी चंद्रकांत रामदास साळुंखे याची माहिती मिळाली. त्यानंतर अधिक माहिती मिळविली असता संशयित आरोपी हा एरंडोल शहरात असल्याचे समजले. त्यानुसार सोमवारी सकाळी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सलीम तडवी, रवींद्र साबळे, तुषार पाटील, महिला पोलिस नाईक भारती देशमुख यांनी संशयित आरोपी चंद्रकांत साळुंखे याला एरंडोल शहरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत केल्या आहेत. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम