जिल्हाप्रमुख मानेंच्या वाढदिवसाला तरुणांना मिळणार नोकरी !
बातमीदार | २६ ऑक्टोबर २०२३
जळगाव जिल्ह्यातील ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने हे नेहमीच सामजिक कार्याच्या माध्यमातून नेहमीच चर्चेत येत असतात. आता पुन्हा एकदा त्यांच्या वाढदिवसानिमित्त एरंडोल येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरुणांनी मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. सदर मेळावा दि. २६ रोज एरंडोल येथील कमल लॉन्स, धरणगाव रोड येथे सकाळी १० ते ५ या वेळेदरम्यान आयोजित करण्यात येणार आहे.
एरंडोल येथे दि २६ ऑक्टोबर रोजी डॉ. हर्षल माने यांच्या ४८ व्या वाढदिवसानिमित्त भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात गरजू सुशिक्षित बेरोजगारांनी मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. माने यांच्याकडून करण्यात आले आहे. आपण समाजाचे काही तरी देणे लागतो. म्हणून मी शिवसेना पदाधिकारी यांच्या सहकार्याने तसेच आरोग्य सेवक रोशन मराठे (लक्ष्य फाउंडेशन) यांच्या सहकार्याने ह्या भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.
त्यात मुंबई, पुणे, नासिक, संभाजीनगर व जळगाव सारख्या मोठ्या शहरात उपलब्ध असलेल्या नामांकित मल्टी नॅशनल कंपन्यांत रोजगार उपलब्ध करून देणार आहोत. या भव्य रोजगार मेळाव्यासाठी शैक्षणिक पात्रता किमन आठवी, दहावी, बारावी तसेच पदवी उत्तीर्ण अशी आहे. यासोबत सर्व ट्रेडचे आयटीआय, डिप्लोमा, अभियांत्रीकी पदवीधर शैक्षणिक पात्रता धारक युवक- युवर्तीसाठी याचे आयोजन करण्यात आले असून नियुक्ती झालेल्या युवक-युवती यांना जागेवरच नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे. दरम्यान, तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरजू युवक-युवती यांनी या भव्य अश्या रोजगार मेळाव्याचा फायदा व्हावा म्हणून त्यांना आवाहन करण्यात येत आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम