‘मी’ आमदार झालो तेव्हा तुमचा जन्म नव्हता ; भूजबळांची टीका !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १० जुलै २०२३ ।  राज्यातील राष्ट्रवादीत अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवारांनी जनतेच्या न्यायालयात जावून न्याय मागण्यासाठी पहिली सभा येवल्यात घेतली होती. त्या सभेत त्यांनी छगन भुजबळांवर काही आक्षेप नोंदवले. त्याला भुजबळांनी उत्तरही दिली. मात्र रोहित पवारांनी या वादात उडी घेऊन नव्या चर्चेला तोंड फोडलं आहे. रोहित पवारांनी छगन भुजबळांवर टीका केली होती. शरद पवारांनी आणि पक्षाने छगन भुजबळ यांना मोठं केलं परंतु ते विसरले, अशा आशयाची टीका त्यांनी केली. त्याला छगन भुजबळ यांनी इतिहास सांगून उत्तर दिलं.

भुजबळ म्हणाले की, मी १९८५ मध्ये महापौर आणि आमदार झालो होतो. तुमचा जन्म त्यानंतर चार महिन्यांनी झाला. त्यामुळे मला मोठं केलं, अशा गोष्टी करु नका. तुम्हाला आत्ताच काही जास्त बोलत नाही. मात्र तुमच्या मतदारसंघात जावून उत्तर देईल, असं भुजबळ म्हणाले. ते पुढे म्हणाले की, अजित पवार आणि तुम्ही पवार घराण्याने ठरवून साहेबांचा राजीनामा घ्यायचं ठरवलं. त्याबद्दल आम्हांला सांगितलं होतं का? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. शरद पवारांना सभेतूनच उत्तर देण्याविषयी भुजबळांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले की, आठ दिवस झाले तरी मंत्रिमंडळ विस्तार होत नाही असं काही जण म्हणत आहेत. परंतु महाविकास आघाडी सरकारमध्ये तर महिन्याभरानंतर शपथविधी झाला होता.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम