आरक्षण मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही ; मनोज जरांगे पाटलांनी आखला प्लान !
बातमीदार | ५ नोव्हेबर २०२३
सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची गुरुवारी भेट घेतल्यानंतर हे उपोषण तूर्त स्थगित झाले असून उपोषणानंतर मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली होती, ते अशक्त झाले होते. उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, त्यानंतर आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी बोलताना त्यांनी पुढे काय कारायचं हे सांगितलं आहे.१ डिसेंबरपासून साखळी उपोषण करणार असल्याचंही सांगितलं आहे. तसेच आपण पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार आहे.
महाराष्ट्रातील दौरा कधीपासून सुरु होणार ते उद्या किंवा परवा जाहीर करणार आहे. या दौऱ्यात आतापर्यंत राहिलेल्या भागांत आपण जाणार असून मराठा समाज बांधवांची भेट घेणार आहे. तर पुढे म्हणाले की, कोणीही आत्महत्या करु नका. २४ डिसेंबरपर्यंत आपणास खांद्याला खांदा लावून लढायचं आहे. न्यायाचा दिवस जवळ आला आहे. आतापर्यंत आमच्यावर खूप अन्याय झाला आहे. हक्काचे आरक्षण आम्हाला मिळाले नाही. आता आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही. यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, ‘आता आरक्षण मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही. आतापर्यंत मराठा समाजावर खूप अन्याय झाला आहे. परंतु आता चांगले दिवस आले आहे. आरक्षण मिळण्याचा दिवस जवळ येत आहे. तसेच जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आपलं साखळी आंदोलन सुरु राहणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितलं आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम