म्हणून गृहमंत्री फडणवीस जबाबदार ; खा.सुळे !
बातमीदार | २६ नोव्हेबर २०२३
आंतरवाली सराटीमधील दगडफेकीतील संशयित आरोपी ऋषीकेश बेदरेला अटक करण्यात आल्यानंतर आमदार नीतेश राणे यांनी फोटो ट्विट करत शरद पवार गटावर टीका केली आहे. आता त्यावर शरद पवार गटाच्या खा.सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली आहे.
महाराष्ट्र अस्थिर झाला असून गुप्तचर विभागाचे अपयश असून त्याला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याची सडकून टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम या आरक्षणवर कोणतेही विधेयक अधिवेशनात आले तर आम्ही पूर्ण ताकदीने सहकार्य करू, असेही त्यांनी सांगितले.सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 26/11 भारतातील नवे तर जग काळा दिवस म्हणून बघते. या योद्धांनी आपल्या कुटुंबाची काळजी न करता देशासाठी योगदान दिले. 26/11 जग कधीच विसरणार नाही. नीतेश राणेंनी केलेला आरोप मी पाहिलेला नाही, त्यामुळे मी यावर बोलणार नाही. माझे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अनेकांसोबत फोटो आहे, याचा अर्थ आम्ही सगळ्यांना ओळखतोच असे नाही, असेही त्यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की, एखादा आमदार आणि खासदारावर हल्ला होत असेल तर त्याचे अपयश गृह विभागाचे आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी फडणवीस यांचा राजीनामा मागते ते वैयक्तिक कारणासाठी नाही, भाजपच्या खासदारावर दगडफेक झाली यात अपयश फडणवीस यांचे नाही, पण नैतिक जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे, ते सरकारचे अपयश आहे. सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, माझ्यासमोर बेरोजगारी आणि इतर समस्या भीषण असून मी त्यासाठी लढत आहे. महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण खराब होत असेल तर त्यासाठी सरकार जबाबदार आहे. सगळ्यांत मोठे आव्हान भीषण दुष्काळ आहे. ट्रिपल इंजिन खोके सरकार यावरून इतरांच लक्ष दूर करत आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम