
या अभिनेत्रीने कधी काळी धुतली आहे दुसऱ्याच्या घरी भांडी !
दै. बातमीदार । ८ एप्रिल २०२३ । मराठी सिनेअभिनेत्यांची नेहमीच एक वेगळी ओळख असते अनेक कलाकार आपल्या जुन्या आठवणी नेहमीच जिवंत करून भविष्यात संघर्ष करणारे अभिनेत्यासमोर एक आदर्श ठेवत असतात, अशीच एका अभिनेत्रीने चक्क एका काळी अनेक कामे करून आज तीच अभिनेत्री राज्याची लाडकी अभिनेत्री झाली आहे. ती म्हणजे प्रमुख भूमिकेत फार वाट्याला आल्या नसल्या तरी सहाय्यक भूमिकांमधून मराठी टेलिव्हिनजन, नाटक क्षेत्रात आपलं नाव कमावणारी अभिनेत्री म्हणजे सुप्रिया पाठारे.
विनोदाचं कमाल टायमिंगनं सुप्रिया पाठारेनी प्रेक्षकांची मनं जिंकली. आज प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या अभिनेत्री सुप्रिया पाठारेंनी आयुष्यातील असे काही दिवस पाहिलेत ज्याची प्रेक्षकांना जाणीव देखील नसेल. अभिनेत्री सुप्रिया पाठारे आज त्यांचा पन्नासावा वाढदिवस साजरा करत आहेत. अभिनय क्षेत्रात काम करत असताना मागे वळून पाहताना लक्षात येत की त्यांचा इथवरचा आतापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता.
फू बाई फू, होणार सून मी ह्या घरची, पुढचं पाऊल सारख्या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या सुप्रिया पाठारे एकेकाळी लोकांच्या घरची भांडी घासायला जायच्या. सुप्रिया पाठारे यांची लहान बहिण म्हणजेच अभिनेत्री अर्चना नेवरेकर. अर्चना नाटकात काम करायच्या आणि सुप्रिया त्यांच्याबरोबर सोबत म्हणून जायच्या. सोबत येण्याचे अर्चना सुप्रिया यांना 100 रुपये द्यायच्या.
तर सुप्रिया पाठारेंना नाचाची आवड होती. अर्चना पालेकर यांच्याकडे त्यांना भरतनाट्यम शिकायचं होतं. त्यासाठी त्यांनी मैत्रिणीकडे भांडी घासायचं काम करून केलं. या कामाचे त्यांना 100 रुपये मिळायचे. त्यातून त्या भरतनाट्यमच्या क्लासची 70 रुपये फि भारायच्या. 70 रुपये क्लासची फी दिल्यानंतर उरलेले 30 रुपये त्या आईला द्यायच्या. तेव्हा आईबरोबर सुप्रिया जवळपास 18 घरात जाऊन भांडी घासायची काम करायच्या.
चार भावंडांमध्ये सुप्रिया सर्वात मोठ्या. कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी म्हणून त्या भांडी घासायच्या कामाबरोबरच कधी रस्त्यावर अंडी विकणं, चणे विकायला जाणं, कधी दुधाच्या बाटल्या घरोघरी नेऊन देणं अशी काम देखील करायच्या. सुप्रिया पाठारे नक्कल उत्तम करतात. शाळेत देखील एका बाईंची नक्कल करताना दुसऱ्या बाईंनी पाहिलं आणि त्यांना नाटकांत काम करण्याची संधी दिली. आजवर सुप्रिया पाठारे यांनी ‘फु बाई फु’, ‘जागो मोहन प्यारे’, ‘मोलकरीणबाई’ सारख्या मालिका ‘श्रीमंताघरची सून’, ‘चि. व चि. सौ कां’, ‘बाळकडू’ सारख्या सिनेमा आणि नाटकांत काम केली आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम