देशातील या मोठ्या बँकेचे होणार विलीनीकरण !
दै. बातमीदार । ४ जुलै २०२३ । देशातील अनेक बँकेचे यापूर्वी देखील विलीनीकरण झालेले असतांना आता पुन्हा एका बँकेचे विलीनीकरण होत असल्याच्या बातम्या येवू लागल्या आहे. आता आयडीएफसी आणि आयडीएफसी फायनॅन्स होल्डिंगच्या विलीनीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. हे मर्जर या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होणार आहे.
आयडीएफसी लिमिटेड (IDFC Ltd) आणि आयडीएफसी फायनॅन्शिअल होल्डिंग (IDFC Financial Holding Company) कंपनीच्या विलीनीकरणाला मंजुरी मिळाली आहे. या विलीनीकरणाच्या रेश्योला १५५:१०० निश्चित करण्यात आलाय. याचाच अर्थ आयडीएफसीच्या १०० शेअर्सच्या मोबदल्यात आयडीएफसी फर्स्ट बँकेते १५५ शेअर्स दिले जातील. आयडीएफसी फर्स्ट बँकेनं शेअर बाजाराला याची माहीती दिली आहे. या विलीनीकरणामुळे बँकेला मजबूतीसह अधिक मोठं होण्यास मदत मिळणार आहे.
दरम्यान, मर्जरनंतर बँकेचे प्रति शेअर बुक व्हॅल्यूमध्ये ४.९ टक्क्यांची वाढ होणार असल्याची माहिती बँकेनं रेग्युलेटरी फायलिंगमध्ये देण्यात आली आहे. या वर्षाच्या अखेरीस हे मर्जर पूर्ण करण्यात येणार आहे. मार्च अखेरपर्यंत आयडीएफसी फर्स्ट बँकेची एकूण संपत्ती २.४ लाख कोटी होती. कंपनीचा टर्नओव्हर२७,१९४.५१ कोटी रुपये होता. तर बँकेला २४३७.१३ कोटी रुपयांचा नफा मिळाला होता.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम