‘या’ जिल्ह्याला पावसाचा मोठा फटका ; मदत केली जाहीर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २९ जुलै २०२३ ।  देशातील अनेक राज्यात पावसाचा हाहाकार कायम असून आता पावसाचा वेग वाढला आहे. विशेषत: कोकण, मुंबई, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग आणि मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात मालमत्तांचे व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी या आपत्तीग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत जाहीर केली. जुने निकष डावलून घराच्या पडझडीसाठी वाढीव दराने १० हजार, दुकानदारांना ५० हजार, तर टपरीधारकांना १० हजार रुपयांपर्यंत मदत दिली जाईल.

जून ते ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या नुकसानीची वाढीव दराने भरपाई दिली जाईल, असेही त्यांनी विधानसभेत सांगितले. अतिवृष्टीमुळे राज्यातील १६ जिल्ह्यांत सुमारे ८ लाख १० हजार हेक्टर शेतीतील कापूस, तूर, साेयाबीन, भात, नाचणी, केळी, मका, उडीद आदी पिकांचे नुकसान झालेले आहे. त्याची भरपाई देण्याबाबत मात्र मुख्यमंत्र्यांनी काहीही घोषणा केली नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

नांदेडमध्ये १,६९,८८७ हेक्टर, जळगाव १४९५, अकाेला १,३७,६५८, बुलडाणा १,५२,४१३ हेक्टर, अमरावती ४०,२१९, यवतमाळ २,४८,२१५, वाशिम ४५,८७४, नागपूर १९९, भंडारा २२३५, चंद्रपूर ५७५८, गडचिरोली ४०२, वर्धा १६५९, सिंधुदुर्ग २९२, रत्नागिरी ४८, रायगड ३७१०, पालघर १७ हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी खात्याने प्राथमिक पाहणीत केलेल्या अहवालात नमूद केला अाहे. घर पाण्यात बुडालेे, वाहून गेल्यास पूर्वी २५०० रुपये व भांडी/वस्तू यांची भरपाई म्हणून २५०० असे एकूण ५ हजार रुपये मिळत. आता आपत्ती प्रतिसाद निधीची अट शिथिल करत ही रक्कम सरकारने दुप्पट म्हणजे १० हजार रुपये प्रतिकुटुंब केली आहे.

नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झाल्यास आजवर दुकानदारांना कुठलीही मदत मिळत नव्हती. पण सरकारने हा नियम बदलला. आता दुकान पाण्यात बुडाले किंवा वाहून गेल्यास नुकसानीच्या ७५ % किंवा कमाल ५० हजार दिले जातील. छोट्या टपऱ्यांमध्ये व्यवसाय करणारे अनेक जण आहेत. अशा व्यावसायिकांचे नुकसान झाल्यास राज्य आपत्ती निधीतून मदत नव्हती. पण आता अशा टपरीधारकांनासुद्धा प्रत्यक्ष नुकसानीच्या ७५ टक्के किंवा कमाल १० हजार रुपये मिळतील.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम