मलकापुरात दोन बस धडकल्या ; ५ ठार तर ३० जखमी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २९ जुलै २०२३ ।  राज्यातील बुलढाणा जिल्हात गेल्या काही दोन महिन्यापासून बसच्या अपघाताची मालिका नियमित सुरु असून आज पुन्हा एकदा पहाटेच्या सुमारास दोन खाजगी बसचा भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मलकापूर शहरातून जाणाऱ्या नॅशनल हायवे क्रमांक सहा वर दोन ट्रॅव्हलसचा समोरासमोर धडकून भीषण अपघात झाल्याचे घटना आज दि. 29 जुलै रोजी सकाळी तीन वाजेच्या सुमारास लक्ष्मी नगर उडाण पुलावरती घडली. या धडकेत पाच प्रवाश्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

हायवे क्रमांक सहा हा मलकापूर शहरातू जात असतो. या महामार्गावर दोन ट्रॅव्हलचा समोरासमोर धडकल्याची घटना आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास लक्ष्मी नगर उड्डाण पुलावरती घडली. या धडकेत ५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे समजते. तर 25 ते 30 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. एम.एच 08. 9458 ही ट्रॅव्हल्स अमरनाथ येथून हिंगोलीच्या दिशेने जात होती. या बसमध्ये 35 ते 40 तीर्थयात्री प्रवास करत होत. तर नागपूर वरून नाशिकच्या दिशेने जात असलेल्या एम.एच 27 बी.एक्स. 4466 या ट्रॅव्हल्समध्ये 25 ते 30 प्रवाशी होते. दरम्यान मलकापूर शहरातून जाणाऱ्या हायवे क्रमांक 6 वरती समोरासमोर धडक बसल्याने या बसेसचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये दोन्ही बस चिरडल्याचे पाहायला मिळाले. या दुर्घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू झालाय तर दोन्ही ट्रॅव्हल्स मधील ते 20 ते 25 प्रवासी जखमी आहेत. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक अशोक रत्नापारखी, दसरखेड एम.आय.डी.सीचे पोलीस निरीक्षक यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांसहित घटनास्थळी जाऊन मदत कार्य सुरू केले. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना बुलढाणा येथे हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम