मंत्री मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत गुन्हेगार माजी नगरसेवक भाजपात दाखल

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १६ ऑक्टोबर २०२२ ।  राज्यात भाजप व शिंदे गटाकडे राज्याची सत्ता असल्याने भाजपमध्ये येनाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. अशातच चंद्रपूरमध्ये हत्या-दंगलीच्या गुन्ह्यातील माजी नगरसेवकाने भाजपात प्रवेश केला आहे. कॅबिनेटमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीतच हा प्रवेश सोहळा पडला.

भाजपमध्ये वाशिंग मशीन असल्याचा आरोप विरोधक करत असतात. अशातच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या माजी नगरसेवकाने भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे चंद्रपूर शहरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. चंद्रपूरमध्ये अजय सरकार या अपक्ष नगरसेवकाने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शनिवारी रात्री शहरातील बंगाली कॅम्प भागात वनमंत्री आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. शानदार अशा सोहळ्यात हा प्रवेश सोहळा पार पडला. धक्कादायक म्हणजे, हत्या-दंगली सारखे गुन्हे या माजी नगरसेवकावर आहे. गेली 5 वर्षे चंद्रपूर मनपात भाजपची सत्ता आहे. महिनाभरात होऊ घातलेल्या मनपा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम