प्रगती विद्यामंदिर येथे लोकमान्य टिळक जयंती साजरी

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २३ जुलै २०२२ । जळगाव येथे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळविणारच अशी सिंह गर्जना करणारे लोकमान्य टिळक यांची जयंती प्रगती विद्यामंदिर येथे साजरी करण्यात आली. इ पहिली ते सातवीच्या वर्गांमध्ये विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. कार्यक्रमाचे आयोजन शिक्षक मनोज भालेराव यांनी केले.

तांदळवाडी विकासो चेअरमन दिपक पाटील, व्हा.चेअरमन अरूण धनगर बिनविरोध 

सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा फेगडे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या प्रसंगी टिळकांच्या विचारांवर भाषण दिले. काहींनी लोकमान्य टिळक यांची प्रतिमारूपी चित्रे काढून आणलीत, काहींनी त्यांच्या विचारांना उजाळा दिला. कार्यक्रमाला शिक्षक संध्या अट्रावलकरं व अविदिप पवार, विजया पाटील यांनी आपले मनोगत सांगितले. सूत्रसंचालन अलका करणकर तर आभार रत्नप्रभा पवार यांनी केले.

या प्रसंगी प्रगती शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा फेगडे, मनीषा पाटील, ज्योती कुलकर्णी शिक्षक रमेश ससाणे, ज्योती बागुल व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

भोरटेक येथे विजेच्या शॉर्टसर्किटमुळे एका शेताला आग

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम