आजचे राशीभविष्य – सोमवार, ६ जून २०२२

बातमी शेअर करा...

मेष:-

आपला ठसा उमटवण्याची संधी मिळेल. कुटुंबाच्या बाबतीत सौख्य जाणवेल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. मित्रांच्या गराड्यात राहण्याची इच्छा होईल.

वृषभ:-

व्यवसायातून चांगली कमाई होईल. व्यवहारी दृष्टीकोनातून विचार कराल. कौटुंबिक गैरसमज टाळावेत. मानसिक चांचल्य जाणवेल.

मिथुन:-

वरिष्ठांच्या सहकार्यावर अवलंबून राहू नका. मोहाला बळी पडू नका. निर्णयात इतरांवर विसंबून राहू नका. व्यावसायिक आघाडीवर सतर्क रहा.

कर्क:-

दिवस कामात व्यतीत होईल. भावनाविवश होऊन विचार करू नका. मोठ्या वस्तूंची खरेदी कराल. थोडे अधिक श्रम घ्यावे लागू शकतात.

सिंह:-

कामाशिवाय इतर गोष्टी टाळाव्यात. अधिकार्‍यांना नाराज करू नका. जोडीदाराचा राग समजून घ्यावा लागेल. भागीदाराशी मतभेदाची शक्यता.

कन्या:-

अपचनाचा त्रास जाणवेल. हातातील संधी जाऊ देऊ नका. माहितीच्या आधाराने कामात यश येईल. संपर्कात वाढ होऊ शकेल.

तूळ:-

प्रेम प्रसंगात सावधानता बाळगा. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. वरिष्ठांच्या सूचनेचे तंतोतंत पालन करावे. अचानक धनलाभाची शक्यता.

वृश्चिक:-

व्यावसायिक कामातून मानसिक शांतता लाभेल. व्यक्तिगत छंद जोपासावेत. क्रोधाची भावना उचंबळू देऊ नका. क्षुल्लक चुका टाळण्याचा प्रयत्न करावा.

धनू:-

आवक मर्यादित राहील. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. अधिकाराचा योग्य ठिकाणी वापर करावा. रेस, जुगार यातून लाभ संभवतो.

मकर:-

विचारांच्या गतीला आवर घालावी लागेल. सढळ हस्ते खर्च केला जाईल. परिस्थितीचा योग्य अंदाज बांधावा.

कुंभ:-

प्रतिस्पर्ध्यांवर मात करता येईल. व्यवसायात नवीन योजना आखाव्यात. कुटुंबियांशी वाद घालू नका. बोलण्यावर संयम ठेवावा लागेल.

मीन:-

जोडीदाराच्या तब्येतीकडे विशेष लक्ष द्यावे. कौटुंबिक कामासाठी अधिक वेळ द्याल. सामाजिक गोष्टींचे भान राखून वागाल. आध्यात्मिक कामातून मनाला शांतता लाभेल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम