आजचे राशीभविष्य, सोमवार २६ सप्टेंबर २०२२
दै. बातमीदार | २६ सप्टेंबर २०२२ | मेष – शांत राहून कामे करा. संमिश्र घटना घडू शकतात. काही बाबतीत लाभ मिळू शकतात.
वृषभ – कुटुंबातील लोकांसोबत वेळ चांगला जाईल. लाभाच्या संधी उपलब्ध होतील. अधिक परिश्रम घेण्याची गरज भासेल. सरकारी नोकरदार वर्गाने शांततेचे पालन करावे.
मिथुन – संभ्रमात अडकून राहू नका. विनाकारण खर्च करू नका. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस.
कर्क – तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. जुनी येणी वसूल होतील. हातातील कामे पूर्ण करण्यात दिवस जाईल.
सिंह – व्यावसायिक ठिकाणी अधिकार प्राप्त होतील. आपले म्हणणे लोकांना पटेल. विरोधकांच्या कारवायांकडे लक्ष ठेवा.
कन्या – बोलण्यातून लोकांना आपलेसे करा. हाती घेतलेल्या कामात यश येईल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.
तूळ – प्रकृतीची काळजी घ्या. एखादी महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल. काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
वृश्चिक – प्रिय व्यक्तीचे मत टाळू नका. हातातील काम पूर्णत्वास न गेल्याने चिडचिड होईल. अधिकार्यांशी मतभेद होण्याची शक्यता.
धनू – घरगुती गोष्टींसाठी पैसे खर्च होतील. कोणत्याही गोष्टीची अति घाई करू नका. कामातून समाधान लाभेल.
मकर – भागीदारीच्या व्यवसायात चोख रहा. सर्व अटी तपासून पहा. समस्येतून मार्ग काढाल.
कुंभ – मानसिक स्थिती भक्कम करा. अनावश्यक खर्चात वाढ होईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील.
मीन – बोलताना शब्दांचे वजन लक्षात घ्या. मुलांबरोबर दिवस मजेत घालवाल. एखाद्या स्पर्धेत यश मिळवाल.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम