
आजचे राशीभविष्य, मंगळवार १३ सप्टेंबर २०२२
दै. बातमीदार | १३ सप्टेंबर २०२२ | मेष – फसव्या आश्वासनांपासून दूर रहा. आत्मविश्वासाने कामे करा. अनेक दिवसांपासूनच्या अडचणी दूर होतील. आर्थिक बाजू सुधारेल. प्रवास लाभदायक ठरू शकतील.
वृषभ – जीवनस्तर सुधारण्याचे योग. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. जोडीदाराला खुश कराल.
मिथुन – धडपड करून का होईना काम पूर्ण कराल. कामांना अपेक्षित गती येईल. शाश्वत प्रयत्न करत रहा. हातातील कामात निष्काळजीपणा करू नका.
कर्क – करियर व वैयक्तिक चिंता सतावतील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. समस्यांचे निराकरण करण्यात यश येईल.
सिंह – व्यापारी वर्गाने परिस्थिती लक्षात घेऊन वागावे. मंदी चिंता वाढवणारी असेल. नोकरदार वर्गाने आळस झटकून कामे करावीत.
कन्या – चिकाटी सोडू नका. दिवस धावपळीचा जाईल. मात्र त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील. कौटुंबिक सदस्यांचा स्नेह वाढेल.
तूळ – विनाकारण मन चिंताग्रस्त राहील. आपले स्पर्धक त्रस्त करू शकतात. साहसाच्या जोरावर कामे पूर्ण कराल.
वृश्चिक – काहीसा मानसिक त्रास संभवतो. त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ देऊ नका. नैराश्य टाळण्याचा प्रयत्न करा.
धनू 1 नवीन ओळख लाभदायक ठरेल. निष्काळजीपणा करू नका. आत्मविश्वासाने काम करा.
मकर – अति अपेक्षा बाळगू नका. धार्मिक कामात सहभागी होण्याची संधी मिळेल. प्रलोभनांना बळी पडू नका.
कुंभ – अधिकार्यांच्या सहकार्याचा वापर करून घ्या. वेळेचा सदुपयोग करावा. मेहनतीला पर्याय नाही.
मीन – गुरु कृपेमुळे उन्नती साधता येईल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. हितशत्रूपासून सावध राहावे. मोठे व्यवहार आज टाळता आले तर पहा.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम